पुरुषाची छाती दर्शवते त्याचे चरित्र…सामुद्रिक शास्त्र

0
2181

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्राचे खुपच अद्भुत आणि अनमोल ज्ञान सांगणार आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार रुंद छातीचे लोक साहसी असतात. जाणून घ्या छातीनुसार पुरुषांचे वर्चस्व कसे असते.

सामुद्रिक शास्त्रावरून पुरुषांचा स्वभाव आणि चरित्र ओळखले जाऊ शकते. पुरुषांची छाती बघून त्यांच्या मनात लपलेल्या गोष्टी आपण सहजपणे जाणून घेऊ शकतो.

समतल छाती असणारे पुरुष

ज्या पुरुषाची छाती समतल असते असे लोक पैशाकडून संपन्न असतात पण असे पुरुष स्वभावाने सामाजिक नसून व्यवहारिक असतात. तर दुसरीकडे या लोकांमध्ये मौलीकता ही कमी असते.

हे लोक परिवारापेक्षा आपल्या कामाकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे काही वेळा अशा लोकांचे आपल्या पत्नी सोबत भांडण होते. पण अस नाही की असे लोक आपल्या परिवारासाठी काहीच करत नाहीत. असे लोक आपल्या परिवाराला सर्व प्रकारचे सुख सोयी देतात.

छाती फुगीर असणारे पुरुष

ज्या पुरुषांची छाती जास्त फुगीर असते अशा पुरुषांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि असे पुरुष साहसी आणि पराक्रमी असतात आणि त्याचबरोबर मेहनती ही असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार असे पुरुष भावुक ही असतात पण आपला भावुकपणा कोणासमोर व्यक्त करत नाहीत. आणि यांचा जोडीदार ही यांच्यावर अधिक प्रेम करतो. असे पुरुष लहान लहान गोष्टींवर लगेच चिडतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा अवगुण आहे.

छातीवर केस असणारे पुरुष

सामुद्रिक शास्त्रानुसार छातीवर केस असणे हे अत्यंत शुभ लक्षण असते असे पुरुष अत्यंत भाग्यशाली असतात, यांना जीवनात अधिक मेहनत करावी लागत नाही. अशा पुरुषांना जीवनातील सुख सोयी सहजपणे प्राप्त होतात. यांचा सर्वात मोठा गुण असतो तो म्हणजे यांचा दयाळू स्वभाव. हे पुरुष अत्यंत दयाळू असतात. आणि विनाकारण कोणावर चिडतही नाहीत. म्हणून पुरुषांच्या छातीवर केस असणे हे शुभ लक्षण असते.

छातीवर केस नसणारे पुरुष

ज्या पुरूषांच्या छातीवर अजिबात केस नसतात सामुद्रिक शास्त्रानुसार अशा पुरुषांना विश्वास पात्र मानले जात नाही. हे पुरुष मतलबी असतात आणि असे म्हणतात की हे पुरुष कधीही कोणालाही धोका देऊ शकतात. याच्यात व्यवहार आणि कुशलता ही कमी असते आणि यामुळे लोक यांना कमी पसंद करतात. म्हणून सामुद्रिक शास्त्रात छातीवर केस नसणे हे अशुभ संकेत मानले गेले आहे.

रुंद छाती असणारे पुरुष

सामुद्रिक शास्त्रात रुंद छाती असणारे पुरुष हे अत्यंत साहसी असतात असे सांगितले आहे. हे पुरुष साहसी असण्यासोबतच मेहनती ही असतात. आणि हे पुरुष सफलता स्वतःच्या जीवावर प्राप्त करतात.

या पुरुषांमध्ये बुद्धी ही अधिक असते ज्यामुळे हे पुरुष आपली बुद्धी आणि पराक्रमाचा योग्य वापर करून जीवनात सफलता प्राप्त करतात. असे पुरुष संघर्षापासून कधीच घाबरत नाहीत. या पुरुषांमध्ये सकारात्मकता खूप असते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here