नमस्कार मित्रांनो
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त असून मौनी अमावस्येला सर्वश्रेष्ठ अमावस्या मानले जाते. शास्त्रानुसार पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला पौष मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते.
शास्त्रानुसार मौनी अमावस्येला मौन व्रत धारण करून भगवान विष्णूची भक्ती केल्याने अनेक सिद्धी प्राप्त होतात. मित्रांनो चंद्राचा संबंध व्यक्तीच्या मनाशी असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो.
अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्यामुळे याकाळात स्वतःच्या वाणी आणि मनावर नियंत्रण ठेवून अनेक शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक लाभ प्राप्त केले जाऊ शकतात.
या काळात आपल्या वाणीवरच नाही तर आपल्या मन आणि बुद्धीला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवल्यास मन निर्मळ होऊन अध्यात्मिक उन्नती होते आणि आत्मविश्वास वाढतो.
असे मानले जाते कि मौनी अमावस्येच्या दिवशी संगम तटावर गंगा नदीमध्ये देवतांचा वास असतो त्यामुळे या दिवशी गंगा स्नान करणे विशेष फलदायी मानले जाते.
या वर्षीच्या मौनी अमावस्येला अति विशेष महत्व प्राप्त असून या दिवशी ग्रहांचा अतिशय दुर्लभ संयोग बनत आहे. या संयोगाला कुंडामध्ये स्नान करून पितरांचे पूजन करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण करून तिळाचे दान करणे महापुण्यदायी मानले जाते. यामुळे मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन स्वर्गाची प्राप्ती होते.
या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करून त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावणे आणि तिळगुळासोबत वस्त्राचे दान करणे विशेष फलदायी मानले गेले आहे. सोबतच या दिवशी गरजूंना अन्नदान केल्याने आपल्या धन संपत्तीची मध्ये वाढ होण्यास मदत होते.
या दिवशी पितरांना मिठाई अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष दूर होतात. पितरांच्या आशीर्वादाने आपल्या धनसंपत्ती आणि सुख सौभाग्यात वाढ होते.
अमावस्येच्या शुभ प्रभावाने आणि ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशींचे नशीब चमकणार असून यांच्या जीवनात राजयोगाचे दिवस येणार आहेत. इथून पुढे येणार काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.
आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा अंत होणार असून सुख समृद्धी आणि वैभवाने आपले जीवन बहरून येणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी राजयोगा सामान सिद्ध होणार आहे.
आपल्या धन संपत्तीत आणि ऐश्वर्यात खूप मोठी भर पडणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष रास, मिथुन रास, सिंह रास , वृश्चिक रास, धनु रास आणि मकर रास.
तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.