नमस्कार मित्रानो
मित्रानो जसा आपल्यावर राशींचा परिणाम होतो तसेच ज्या महिन्यात आपला जन्म झालेला आहे त्या महिन्याचा देखील आपल्यावर प्रभाव होत असतो. मित्रानो ज्योतिषशास्त्रामध्ये जसे तारखेला आणि वेळेला महत्व आहे तसेच जन्म झालेल्या महिन्याला देखील महत्व दिले गेले आहे.
मार्च महिना हा तिसरा महिना आहे. तुमचा जन्म कोणत्याही साली किंवा कोणत्याही वर्षी मार्च मध्ये झालेला असेल तर हि माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रानो मार्च जन्म झालेल्या व्यक्ती या दिसायला आकर्षक असतात व क्रिएटिव्ह असतात.
या व्यक्ती आकर्षणाचा केंद्र बिंदू समजल्या जातात. या व्यक्तींना फिरायला जायला , प्रवास करायला तसेच हिल स्टेशन वर जायला प्रचंड आवडते. त्यामुळे या व्यक्ती नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात असतात.
यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती धार्मिक व मॉडर्न स्वरूपाच्या असतात. हे लोक स्वतःवर जबाबदारी घेऊन आपल्या योग्यतेनुसार मोठ्या पदावर जाताना दिसतात व यश प्राप्त करून दाखवतात.
कोणत्याही व्यक्ती बद्दल किंवा एखाद्या विषयावर बोलण्याआधी संबंधित विषयाची संपूर्ण माहिती काढून मगच त्यावर वक्तव्य किंवा लिखाण करतात. मार्च महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या सर्वांना बोलण्यातून खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ज्या गोष्टींची आवड आहे त्यावर वेळ आणि पैसा खर्च करतात. या महिन्यात जन्म घेतल्या व्यक्तींवर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न असते. त्यामुळे या व्यक्तींना पैशांची कमतरता भासत नाही. या व्यक्ती प्रॅक्टिकली जास्त पैसा कमावतात परंतु यांचा वीक पॉईंट असा आहे कि जवळच्या व्यक्तींवर जास्त पैसा खर्च करतात.
या व्यक्ती आपल्या जीवनात असे काही अचानक बदल करतात कि त्यांचे मित्र मंडळी किंवा नातेवाईक आश्चर्यचकित होतात. या व्यक्ती नशिबापेक्षा जास्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात.
या व्यक्ती आपल्या जोडीदाराला कधीही धोका देत नाहीत. आयुष्यभर प्रामाणिक व आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्ती बुद्धिमान व टॅलेंटेड असतात. या व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्याआधी पूर्ण विचार करूनच करतात.
मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या समाधानी असतात व आपले इमोशन झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या महिन्यातील व्यक्ती काही स्मार्ट असतात तर काही व्यक्ती या निष्काळजी देखील असतात. स्वभावाने मात्र या व्यक्ती मजेशीर असतात.
कोणाच्या दबावात काम करायला यांना आवडत नाही. स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करण्यात यांना जास्त रस असतो. आपले जीवन स्वतंत्र पणे व्यतीत करायला यांना आवडते.
या व्यक्तींनी करियर हे लेखन , नाट्य , कला , संगीत , चिकित्सा , बँकिंग क्षेत्रात जर यांनी करियर केले तर यांना लवकर यश प्राप्त होताना दिसते. या महिन्यात जन्म घेतलेल्या मुली किंवा महिला असतात त्यांना आकर्षक दिसायला फार आवडते.
मेकअप करून टापटीप राहणे , शरीराची विशिष्ट काळजी घेणे यांना चांगलेच जमते. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना सल्ला असा आहे कि त्यांनी स्वतःच्या चंचलतेवर कंट्रोल करावा व आपल्या ध्येयाप्रती समर्पित व्हावे. त्यामुळे पूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल.
या व्यक्तींनी दारूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहावे व स्वतः सुद्धा दारू पिऊ नये. नाही तर जीवन संपण्यास दारूचं कारणीभूत ठरू शकते. मित्रानो तुम्ही दररोज सकाळी पाण्यात मध टाकून सूर्याला जल अर्पण करा जेणेकरून सूर्यदेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहील.
मार्च महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींचा शुभ अंक आहे ३ , ७ आणि ९ . शुभ दिवस रविवार , सोमवार आणि शनिवार. रत्न – एमथिस्ट , शुभ रंग – हिरवा , पिवळा आणि गुलाबी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.