नमस्कार मित्रांनो
मित्रानो नवग्रहांमध्ये मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला गेला आहे. मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. तो मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. मकर राशीत मंगळ ग्रहाला श्रेष्ठ मानले जाते.
ज्योतिषीय गणनेनुसार, मंगळ 13 मार्च 2023 रोजी, सोमवारी सकाळी 05:33 वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीमध्ये मंगळाच्या आगमनाने 3 राशीच्या लोकांना सुखाचे दिवस येण्याचे संकेत आहेत.
वृषभ रास
वृषभ राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे. मंगळ तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर शुभ ठरणार आहे. मार्च महिन्यात मंगळाचे गोचर तुमच्या जीवनात आनंद आणेल. या दरम्यान, तुमच्या नशिबाने काम होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि व्यावसायिकांना फायदा होईल. घरामध्ये शुभ कार्यक्रम होऊ शकतात.
कन्या रास
मंगळाचे राशी परिवर्तन व्यापारी वर्गासाठी खूप शुभ असणार आहे. तुमच्या राशीच्या दहाव्या घरात मंगळाचे संक्रमण होणार आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लिक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.