मकर रास : ऑक्टोबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
552

नमस्कार मित्रानो

मित्रानो मकर हि राशीचक्रातली दहावी राशी असून तिचे बोध चिन्ह आहे शिंगवाला बोकड. मित्रानो हिंदू पुराणांमध्ये मकर हा समुद्री प्राणी असल्याचाही उल्लेख आहे. या प्राण्याचा पुढचा भाग बकऱ्यासारखा आणि उरलेला भाग एखादा मासा, मगरीसारख्या आकाराचा आहे. मगर हा अगदी सुस्तूपणे पडून राहणारा प्राणी परंतु तितक्याच ताकदीने आपल्या शिकारीवर तुटून पडणारा.

शिकारीची वाट बघत अगदी कितीही वेळ सुस्तपणे पडून राहणारा हा स्वभाव मकर राशीचा मंडळींमध्ये दिसून येतो. या राशीचे लोक पूर्ण यश जोवर मिळत नाही तोवर प्रयत्न आणि चिकाटी कधीही सोडत नाहीत. एकदा का यश शेवटच्या मार्गावर आलं कि त्यावर हल्ला करून ते यश आपल्या पदरात पाडून घेणं यांना चांगलंच जमत.

त्यामुळे बऱ्याचदा नियतीसुद्धा त्यांच्या याच संयमाची परीक्षा घेते कि काय त्यांच्या आयुष्यातले प्रसंग पाहिले कि वाटायला लागत. मित्रानो यांना यांच्या मेहनतीचं फळ पुरेपूर मिळत. या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी , वर्ण वैश्य आणि तत्व पृथ्वी असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम हा सर्व वेदबंध असतो. वेळेचं आणि पैशांचं व्यवस्थापन करण्यात हि मंडळी अतिशय हुशार असतात. कष्ट करण्यात यांचा हात कोणीही धरू शकत नाही.

अत्यंत कष्टाळू आणि मेहनती लोकांची हि राशी मानली जाते. यश मिळवण्यासाठी सतत धडपडत राहणारी हीच ती मंडळी असतात. राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे मेहनतीला यश हे बर्यापैकी उशिरा मिळताना दिसत. कारण शनी म्हणजे उशिरा मिळणार यश. परंतु यांच्या उत्तर वयात यांना बऱ्यापैकी सुखाचे दिवस येताना दिसतात. नियोजनात तरबेज असतातच शिवाय चांगला सल्लागार म्हणून देखील यांची ओळख आहे.

नोकरी करून एखादा छोटा व्यवसाय सुद्धा करायची यांची तयारी असते. किंबहुना नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याकडे यांचा जास्त कल असतो. तसेच एकापेक्षा अनेक व्यवसाय करण्याची क्षमता यांच्यामध्ये सर्वात जास्त असते.मकर राशीच्या व्यक्तींची तूळ, मिथुन, कन्या, वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी मैत्री होते. कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीशी यांच फारस पटत नाही.

या महिन्यात तुमच्या कुटुंबावर मंगळाचा प्रभाव आहे त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांना आपत्तीचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर घरात कोणी आधीच गंभीर आजारी असेल तर डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

महिन्याच्या शेवटी, कुटुंबात एखादा नवीन आनंदाचा प्रसन्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाचे मन आनंदी असेल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल जे तुमच्या कामात उपयुक्त ठरेल.

या महिन्यात कामाचा ताण कमी होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा वेळ इतर कामांसाठी देऊ शकाल. या महिन्यात तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही व्यापारी असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल जो तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.

सरकारी अधिकाऱ्यांनाही या महिन्यात प्रवासाला जावे लागू शकते. वाटेत काही अडथळे सुद्धा येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही तणावाखाली रहाल. त्यामुळे आधीच सावध रहा आणि समस्यांना तुमच्यावर अधिराज्य गाजवू देऊ नका आणि येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड द्या.

हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे आणि कमी मेहनतीत जास्त यश मिळण्याची चिन्हे आहेत. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःबद्दल आशावादी राहतील आणि त्यांच्या अभ्यासापेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता दाखवतील. जर तुम्ही शाळेत असाल तर तुम्हाला वडिलांचे मार्गदर्शन मिळेल.स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकतात ज्यासाठी त्यांना काही पैशांची आवश्यकता असेल.

हा महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही कोणासोबत प्रेमसंबंधात असाल तर या महिन्यात ही गोष्ट घरी सांगा, जे तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी असलेले संबंध मधुर होतील आणि काही गोष्टींबाबत दोघांचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील.

लग्नाबद्दल एखादे स्थळ बघून गेले असेल तर तिकडून सकारात्मक रिप्लाय येण्याचे संकेत आहेत. कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळा आणि आपल्या वागण्यात संयम ठेवा.

आरोग्याच्या दृष्टीने महिन्याची सुरुवात चांगली होईल, परंतु तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या उदभवू शकतात, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आधीच काही समस्या असेल तर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि वेळोवेळी तुमची तपासणी करत राहा.

जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर या महिन्यात याचा अधिक त्रास होऊ शकतो. मुतखड्याचा त्रास अचानक वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे मनामध्ये अस्वस्थता राहील.जर तुम्ही काही वर्षांपासून कोणाशी प्रेमसंबंधात असाल आणि त्यांच्याशी लग्न करू इच्छित असाल तर हे तुमच्या घरी सांगा. सर्वांना सांगण्याआधी, सर्वात आधी त्यांना सांगा ज्यांच्याशी तुमचे जुळते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here