तुम्ही पण तुमच्या वडिलांसारखे दिसता का ? स्त्रियांनी नक्की बघा…

0
51

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा आणि पुरुषाचा चेहरा त्याच्या आई सारखा दिसत असेल तर त्याचा काय अर्थ होतो.

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, सामुद्रिक शास्त्र हा एक प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे, ज्याला भारतात सामुद्रिक शास्त्र म्हटले जाते, ज्याला ज्योतिषशास्त्राचा एक भाग देखील मानले जाते.

सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराचे अवयव पाहून व्यक्तीचे स्वरूप आणि भविष्याशी संबंधित माहिती मिळू शकते. सामुद्रिक शास्त्रामध्ये अंगठ्याची लक्षणे, दातांची लक्षणे, हाताची लक्षणे, बोलण्याची लक्षणे, चेहऱ्याची लक्षणे अशा अनेक प्रकारच्या शरीराच्या अवयवांच्या लक्षणांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

तसे मित्रांनो, समुद्रशास्त्रानुसार गणित आणि फलित असे दोन भेद आहेत. बरेच लोक गणिताला खरे मानतात, तर बरेच लोक फलीताला खरे मानतात. आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्रानुसार चेहऱ्याचे प्रकार आणि त्यांच्याशी संबंधित लक्षणांबद्दल सांगणार आहोत.

काही महिलांचां चेहरा त्यांच्या वडिलांशी तर काही महिलांचां चेहरा त्यांच्या आईशी जुळतो. तसेच काही स्त्रिया मिश्र आहेत ज्यांचा चेहरा आई वडील दोघांशी मिळतो. तसेच पुरुषांसोबतही असे घडते, त्यामागील अर्थ काय, हे समुद्रशास्त्रात सांगण्यात आला आहे.

याआधी आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून त्याचा स्वभाव बघू. समुद्रशास्त्रानुसार चेहरे चार प्रकारचे असतात. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्याच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव.

अंडाकृती चेहरा : जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा अंड्याच्या आकारासारखा असेल तर अशी व्यक्ती आकर्षक असते. त्यांचे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असते. अशा व्यक्ती भावनिक असतात, एकदा का ते एखाद्याशी जुळले किंवा त्यांच्याशी मन जुळले तर त्यांना सोडणे या लोकांना जमत नाही. हे लोक सहनशील तर असतातच सोबत लवकर रागावतात सुद्धा. समुद्रशास्त्रानुसार अशा लोकांना भविष्यात प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो.

गोल चेहरा : समुद्रशास्त्रानुसार गोल चेहरा असलेले लोक भाग्यवान मानले जातात. या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते. जेव्हा ते इतरांशी मोकळेपणाने बोलतात तेव्हा इतरांची खिल्ली उडवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ते नवीन लोकांसमोर गंभीरपणे वागतात, परंतु त्यांच्या प्रियजनांसमोर खुलेपणाने वागतात. असे लोक दीर्घायुषी मानले जातात.

चौरस चेहरा : समुद्रशास्त्रानुसार चौकोनी चेहरा असलेले लोक बुद्धिमान आणि क्रोधित मानले जातात. या प्रकारचा चेहरा असलेल्या महिलांना त्यांच्या इच्छेनुसार इतरांकडून कसे काम करून घ्यायचे हे चांगलेच माहीत असते. यांच्यामध्ये चांगली नेतृत्व क्षमता असते आणि व्यवस्थापन क्षेत्रात ते खूप यशस्वी मानले गेले आहेत.

त्रिकोणी चेहरा : जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा त्रिकोणासारखा असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती खूप रचनात्मक आणि क्रियेटीव्ह आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या शैलीत करायला आवडते. विनाकारण कोणाच्याही कामात ढवळाढवळ करायला त्यांना आवडत नाही आणि कलाविश्वात अशा लोकांना नशीब खूप साथ देते. म्हणूनच कलाविश्वात या लोकांनी प्रयत्न करायला हवेत.

आता जाणून घेऊया की पुरुषाचा चेहरा आईसारखा असेल आणि स्त्रीचा चेहरा वडिलांसारखा असेल, तर मग याचा अर्थ काय? समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर तो दीर्घायुषी मानला जातो. अशी मुले चंचल स्वभावाची असतात.

लहानपणी हे आपल्या आई-वडिलांना खूप त्रास देतात. पण भविष्यात खूप नाव कमवतात. ते समुद्रशास्त्रात आनंदी आणि यशस्वी मानले जातात. ते पुढे जाउन आपल्या कुळाचे नाव पुढे घेऊन जातात. ज्या पालकांनी त्यांना जन्म दिला ते खूप भाग्यवान मानले जातात.

तसेच, जर स्त्रीचा चेहरा वडिलांसारखा असेल तर ते खूप शुभ आणि भाग्यवान मानले जाते. ज्या घरात अशी स्त्री लग्न करून जाते त्या घरात सुख-समृद्धी येते. अशा स्त्रिया घरातील कामात तरबेज असतातच सोबतच त्या हुशार आणि कुटुंबाला जोडणाऱ्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वडिलांच्या चेहऱ्यासारखा चेहरा असलेल्या महिला कधीही कोणाला दुखवत नाहीत आणि फसवणुक करत नाहीत. अशी स्त्री एका हुशार मुलाला जन्म देते, जे नंतर खूप नाव कमावतात. अशा महिला धन आकर्षक मानल्या जातात. जर एखाद्या स्त्रीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर ती विवाहासाठी सर्वोत्तम मानली जाते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here