नमस्कार मित्रांनो
मित्रानो 5 फेब्रुवारी 2023 म्हणजेच रविवारचा दिवस आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे. मित्रांनो कलियुगाचा प्रारंभ मग पोर्णिमेपासूनच झाला होता. म्हणूनच या पौर्णिमेच महत्व अनन्य साधारण आहे.
यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्याने या पौर्णिमेच महत्व अनेक पटींनी वाढलेले आहे. खरतर या दिवशी आपण एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करावं असं शास्त्र सांगत. मात्र आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाला हे करणे शक्य होत नाही.
मात्र अशा वेळी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात सफेद तीळ टाकून स्नान करावे. असे केल्याने तीर्थ क्षेत्री जाऊन स्नान केल्याचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होत. मित्रानो अशी मान्यता आहे कि या दिवशी दान धर्म केल्याने आपल्या पुण्यात कैक पटीने वाढ होते. परंतु मित्रानो तुमच्यावर कोणती बाधा झाली असेल तर या दिवशी दूध आणि दही यांचं दान करणे कटाक्षाने टाळा.
ज्यांना साडेसातीचा त्रास होत आहे अशा लोकांनी या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करावी. घरातून तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. झाडाभोवती विषम संख्येत प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
ज्या लोकांचा व्यापार , उद्योग धंदा आहे तो उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाहीये , दुकान चालत नाहीये , ग्राहक येत नाहीयेत. एखाद्याला उधार पैसे दिले असतील आणि समोरून पैसे येत नसतील अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन विलायची घ्यायच्या आहेत आणि त्या विलायची घेऊन आपल्या जवळील शिव मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत या विलायची शिवलिंगावर अर्पण करा.
विलायची अर्पण करण्याआधी तांब्या भर जल आपण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि सोबतच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर अर्पण केलेल्या विलायची मधले दाणे काढून घ्यायचे आहेत.
त्यानंतर ते दाणे आपण पिंपळ वृक्षाच्या खोडावर अर्पण करायचे आहेत. तुम्ही आजवर पहिलेच असेल कि या पिंपळाच्या झाडाच्या आसपास मुंग्या किंवा मुंगळे असतात. हे कीटक विलायची दाणे जसे जसे खातात तस तस तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ लागतात.
तर मित्रांनो या पौर्णिमेनिमित्त हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या सर्व इच्छा , सर्व अपेक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.