अशा पायाचे लोक असतात सर्वात जास्त भाग्यशाली… जीवनात हवं ते मिळवतात..

0
617

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आपण निरीक्षण केले असेल तर आपणास आढळून आले असेल कि काही लोकांच्या पायांची बोटे एक समान असतात तर काही लोक असे असतात कि त्यांच्या पायाची बोटे समान नसतात.

काही लोकांची बोटे ही अंगठ्यापेक्षा मोठी असतात तर कधी अंगठा बाकीच्या बोटांपेक्षा मोठा असतो. पण या बोटांचे लहान किंवा मोठे असण्यामागे वेगळेच महत्व आहे.

शास्त्रानुसार आपल्या शरीराचे अवयव आपल्या बद्दल खूप काही सांगतात. आपण व्यक्तीच्या अवयवांना पाहून त्यांचे व्यक्तिमत्व सांगू शकतो. व्यक्तींच्या अवयवांना पाहून त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्व कसे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. याबद्दलची माहिती समुद्रशास्त्रात विस्तारीतपणे दिली आहे.

आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट जर इतर सर्व बोटापेक्षा लांब असेल तर त्याचे काय रहस्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पायाच्या अंगठ्याचा आकार गोलाकार असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता लाभत नाही.

समुद्र शास्त्रानुसार पायाच्या बोटांची तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचे बोट अंगठ्या पेक्षा लांब असेल तर अशा व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा प्रकारच्या बोटांची रचना सौभाग्य सूचक मानले जाते. अशा व्यक्ती उत्साही आणि भावुक असतात. अशा व्यक्ती फार हुशार असतात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होतात.

अशा व्यक्ती दुसऱ्यांवर अधिकार गाजवतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. तर्जनी आणि अंगठा समान रेषेत असल्यास अशी मंडळी अतिशय कष्टाळू , मेहनती , कामाप्रती प्रामाणिक असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

समुद्र शास्त्रानुसार अंगठा आणि अन्य बोटात अधिक अंतर असेल तर अशा व्यक्ती आतल्या गाठीचे असल्याचे मानले जाते. ज्या लोकांचे पायाशेजारील बोट लहान असते ते लोक नेहमी खुश असतात किंवा खुश राहण्याचा प्रयत्न करतात.

ज्या लोकांची दोन्ही बोटे अंगठ्यासमान असतील आणि बाकीची बोटे लहान असतील तर असे लोक आपल्या मेहनतीसाठी ओळखले जातात आणि असे लोक दुसऱ्यांसोबत भांडणापासून लांब राहतात.

ज्या लोकांचे अंगठ्या शेजारील बोटं उतरत्या क्रमाने असतात असे लोक नेहमीच आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात व नेहमी आपल्या अधिकाराबद्दल बोलत असतात. त्यांना अस वाटत असते की जो मी विचार करत आहे, जे मी करत आहे तेच चांगले आहे आणि लोकांनी पण त्याचा स्वीकार करायला हवा.

जर घरातील किंवा बाहेरील व्यक्ती यांचे म्हणणे ऐकत नसतील तर त्यांना खूप राग येतो. पण एक गोष्ट आहे की हे लोक राग बाहेर काढत नाहीत. समुद्र शास्त्रानुसार अंगठा आणि अन्य बोटात अधिक अंतर असेल तर अशा व्यक्ती आतल्या गाठीचे असल्याचे मानले जाते.

पायाच्या बोटांची रचना सरळ रेषेत असेल तर त्या व्यक्तीचे जीवन सुखमय भविष्याचे संकेत देत असते अशा व्यक्ती खूप सुखी आयुष्य जगतात. आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. आयुष्यात त्यांना खूप आनंद मिळतो.

जर तुमच्या सुद्धा पायाची नखे वाकली असतील तर तुम्हाला पाचन आणि चयापचय संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचनक्रिया ढासळू शकते तसेच नखांचे काठ वाकलेले असणे म्हणजे तुम्ही तणावग्रस्त आहात.

पायाचा अंगठा इतर नखांच्या तुलनेत लांब असेल तर अशा व्यक्ती अत्यंत चतुर आणि रचनात्मक विचारांचे असतात. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here