मित्रांनो सुंदर क्षण जसे हळुवार डोळ्यांपुढे यावेत आणि मी त्यात रमून जावं. किती त्या लाघवी आठवणी. जशा की एखाद्या पुस्तकातल्या प्रेमाच्या गोष्टी सारख्या. मन तिच्याकडे वेध घेत होतं, मन आठवणीत राहत होतं. अनेक भावना मनात काहूर करत होत्या, त्यात त्या कुठेतरी ठळक दिसाव्यात म्हणून आजचे हे प्रेम पत्र.
प्रिये,
आज मी ठरवलंच आहे की तुला एक प्रेम पत्र लिहायचं आहे. म्हणूनच सुरुवात सुद्धा डियर ने न करता प्रिये अशीच केली आहे.
प्रेम पत्र लिहिण्यास कारण, इतकच की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. मराठीत समजत नसेल तर इंग्रजी मध्ये सांगतो आय लव्ह यु.
हे मी या आधीही तुला खूप वेळा एस एम एस द्वारे सांगितले आहे. खरं सांगू तुला इकडून तिकडून ते copy करून मेसेज तुला पाठवलेले असतात पण नेहमी वाटायचं की प्रेमाचा इजहार हा एखाद्या प्रेम पत्राने करावा.
कदाचित तू म्हणशील कि तू तर लटकलास पण तेही तितकाच खर आहे. नाही म्हटलं तरी तू आहेसच तेवढी गोड.
पूर्वीच्या काळी प्रेमात पडलेली माणसे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्रांचा वापर करायची. सैराट मध्ये सुद्धा परश्या आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्राचं माध्यम वापरतो ना. म्हणून मीही ठरवलं की तुला एक सुंदर से प्रेम पत्र लिहून द्यायचं.
बघायला गेलं तर मी हे खूप आधी करायला हवे होते पण सोशल चॅटिंग च्या नावाखाली हे सर्व राहून गेले. स्मायली सेंड केल्यामुळे तुझ्या गालावर पडलेली खळी फक्त काही सेकंद असेच राहणार आहे हे मी आता जाणलं आहे.
मला तुझं हसणं हवं आहे तेही अगदी मनसोक्त. तुझ्या काळ्याभोर डोळ्यात मला स्वतःला पाहायचं आहे. जस पुस्तक वाचताना आपण ते पुस्तकातील जग आपल्या डोळ्यात साठवतो, तसंच हे पत्र वाचताना तू हे नक्कीच डोळ्यात साठवून ठेवशील.
तू माझ्या सोबत असलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. त्या प्रत्येक क्षणाला साक्षी ठेवून माझे हे प्रेम पत्र मी तुला समर्पित करतो. हे प्रेमपत्र नसून एक हमीपत्र आहे माझं तुझ्यावरच्या प्रेमाचं.
तुझाच प्रेम वेडा राजकुमार
मित्रांनो अशाच प्रेमकथा रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले काय राव हे फेसबुक पेज लाइक करा.