नमस्कार मित्रांनो
मित्रानो तुमच्या पत्नीमध्ये जर हे तीन गुण असतील तर तुम्ही जगातील सर्वात भाग्यशाली पती आहात. लग्नाचे स्वप्न प्रत्येक मुलगा बघतो पण त्याला थोडी भीतीही वाटत असते.
तो विचार करत असतो की चुकीची पत्नी मिळाली तर जीवन खराब होऊ शकते. आणि त्याला अस वाटणे हे एकंदरीत बरोबर ही आहे.
म्हणून ते म्हणतात ना की ‘शादी का लड्डू जो खाये वो पचताये, जो ना खाये पचताये’ हे अगदी बरोबर आहे. पण जर पत्नी बरोबर मिळाली असेल तर लग्नानंतर पश्चाताप करावा लागत नाही.
या विषयावर आचार्य चाणक्य यांनी सुद्धा आपले विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्य हे असे विद्वान होते ज्यांना बऱ्याच विषयांवर खूप ज्ञान होते.
त्यांनी गृहस्थ जीवनाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी पत्नीच्या तीन विशेष गुणांबद्दल ही सांगितले आहे.
चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्तीच्या पत्नी मध्ये हे तीन गुण असतात तो खूपच सौभाग्यशाली असतो. असे गुण असणारी पत्नी घराला स्वर्ग बनवून टाकतात. लग्नानंतर ही यांच्या जीवनात काहीच समस्या येत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया हे गुण कोण कोणते आहेत.
धर्म आणि वेदांचे ज्ञान ठेवणारी – आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नीला धर्म आणि वेदांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. देवाबद्दल आस्था असावी. जर तिच्या मध्ये हे सारे गुण असतील तरच ती चुकीचे आणि बरोबर समजू शकेल.
या सारखी पत्नी पूर्ण घराला चांगल्या पद्धतीने सांभाळते. घराचा मानसन्मान बनवून ठेवतात. समाजात आपली मान गर्वाने वर ठेवतात. आपल्या मुलांना योग्य शिक्षण देतात. परिवाराच्या येणाऱ्या पिढीला योग्य संस्कार देतात.
मधुर बोलणे करणारी – आचार्य चाणक्य यांच्यानुसार पत्नी मधुर आणि गोड बोलणारी असावी ज्या व्यक्तीला अशी पत्नी मिळते तो खूपच भाग्यशाली असतो. त्याची पत्नी आपले चांगले विचार, व्यवहार आणि मधुर बोलण्याने प्रत्येकाचे मन जिंकून घेते.
अशा महिला संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन जातात, परिवाराला तुटू देत नाहीत. आशा स्त्रिया घरात कधीच भांडण होऊ देत नाहीत. घरात फक्त आनंद पसरवतात.
पैसे जोडणारी – आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्त्री पैसे जोडून ठेवणारी असावी. ज्या स्त्री मध्ये पैसे बचत करून ठेवण्याची सवय असते आशा स्त्रिया घरासाठी लकी असतात.
जेव्हा परिवार वाईट परिस्थितीमध्ये असतो तेव्हा स्त्रियांचे वाचवलेले पैसेच कामी येतात तर स्त्रियांना सुद्धा आपल्या कामासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागत नाहीत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.