नमस्कार मित्रांनो
नोकरी आणि व्यवसाय
करियरच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी हा महिना अत्यंत चांगला आहे. कार्यसंबंधित अनेक प्रकारचे गैर समज दूर होतील. तुमचे पद वाढण्याचे किंवा प्रमोशन मिळण्याच्या संधी उपलब्ध होईल. बॉस द्वारे तुम्हाला या तीन महिन्यात सन्मानित केले जाऊ शकते.
नोकरी बदलण्याचा निर्णय ही तुम्ही करू शकता. दुसऱ्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील. प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या जातकाना दुसऱ्या शहरात नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. या दरम्यान नोकरी शोधत असणाऱ्या जातकांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
सप्तम स्थानात पडणारी शनीची दृष्टी व्यापार किंवा उद्योग धंद्यात लाभ दर्शवतात, तुम्हाला कामात सफलता प्राप्त होईल. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. तुम्ही व्यापारात गुंतवणूक करू शकता आणि याचा फायदा ही तुम्हाला मिळेल.
प्रेम आणि वैवाहिक जीवन
कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रेम संबंधित गोष्टींसाठी काळ कठीण आहे. मंगळ दृष्टी असल्याने भांडणाचे योग आहेत. जोडीदारासोबत कोणत्याही गोष्टीवरून भांडण होऊ शकते, म्हणून सावधानी बाळगा.
मस्करीत ही वाईट गोष्ट बोलणे टाळा. तुमची गोष्ट चुकीची आहे असं जर जोडीदाराला वाटत असेल तर आपली चूक स्वीकारण्यासाठी वेळ करू नका. जर तुमचे नाते जूने असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवा आणि गैरसमज होण्यापासून वाचा.
मैत्री नविन असेल तर एकमेकांना समजण्यासाठी वेळ लागेल म्हणून धैर्य ठेवा. विवाहित जातकाना शनी ग्रहाची दृष्टी असल्याने समस्या वाढू शकतात. जीवनसाथीच्या बोलण्यात कटुता दिसू शकते. लहान गोष्टींवर वाद विवाद होईल. पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होईल. जीवनसाथीचे तुमच्या प्रति प्रेम ही वाढेल.
आर्थिक
कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हा महिना कठीण राहील. तुमच्या राशीत शनीची उपस्थिती असल्याने खर्च वाढू शकतो पण त्याचबरोबर धनाचे आगमनही होत राहील व आर्थिक समृद्धी होत राहील. सासरकडून योग्य तो सहयोग प्राप्त होईल.
या दरम्यान तुम्ही बिजनेस मध्ये पूर्ण मेहनत कराल. तुमचे अडकलेले धन काढून घेण्यास सक्षम असाल. लहान चढ उतारामुळे टेन्शन घेऊ नका, तर स्वतःवर विश्वास ठेवा. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना सावधान रहा. तुम्हाला छोट्या योजना असणाऱ्या बँकेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सामान्य असेल. पोटाच्या संबंधित समस्या वाढू शकतात, या दरम्यान तुम्ही लगेचच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. फ्रीजमध्ये असणारे जेवण किंवा पाणी पिऊ नका. या काळात व्यायाम आणि योगाची सवय लावून घ्या. रात्री काम केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
40 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या हृदयाची तपासणी करून घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याचे गोचर झाल्यामुळे स्वास्थ्य संबंधित आराम मिळेल. जुन्या आजारापासून मुक्ती ही मिळेल. या दरम्यान घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
कुटुंब
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना कौटुंबिक दृष्ट्या चांगला असेल. कुंभ राशीच्या परिवारात एकता राहील. परिवारातील सर्व सदस्यांचा एक दुसऱ्यांच्या प्रति चांगला ताळमेळ राहील.
जुनाट वादविवाद दूर होतील. पहिल्यापासून संपत्तीची काही समस्या असेल तर ती सुटेल. या दरम्यान कोणतेही मंगल कार्य होऊ शकते, घरातील वातावरण आनंदाचे राहील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.