आंघोळ न करता स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी एकदा हे बघा. विश्वास बसणार नाही

0
2447

नमस्कार मित्रानो

मित्रानो आपले स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व सुंदर ठेवतो त्याचप्रमाणे आपले स्वयंपाक घर देखील स्वच्छ व सुंदर ठेवावे. कारण स्वयंपाक घरात देवी अन्नपूर्णेचा वास असतो.

जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते नाही तर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते. ज्या घरात देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

अशा घरात नेहमी बरकत राहते. जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली कि आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्या घराला अन्न पाण्यासाठी तरसावे लागते.

म्हणून आपण नेहमी देवी अन्नपूर्णेचा आदर केला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ , सुंदर व पवित्र ठेवतो. काही स्त्रियांना सकाळी उठल्यावर लगेचच चहा पिण्याची सवय असते.

अशा स्त्रिया स्नान न करताच तशाच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात. स्वतः हि तसाच चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना देखील देतात. परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते.

सकाळी पतीला , मुलींना टिफिन द्यायचे असतात घाई असते , असे म्हणून बहुतेक स्त्रिया आंघोळ न करताच तशाच स्वयंपाकाला सुरवात करतात. स्वयंपाक झाला सर्वांचे टिफिन दिले कि आरामात आंघोळ करतात.

परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यात अशुद्धी मिसळली जाते. त्याचे पावित्र्य राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते. यामुळेच घरात दारिद्र्य आणि आजारपण यायला सुरवात होते.

म्हणून स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे. स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे. किचन ओटा पुसून घ्यावा. गॅसची शेगडी स्वच्छ करावी. देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतरच गॅस चालू करावा.

आता तुम्ही म्हणाल कि आम्ही तर रात्री किचन साफ केला होता मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचा ? परंतु रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाक घरात देखील असते.

नकारात्मकता गॅस ओट्यावर , किचनच्या शेगडीवर देखील पसरलेली असते. ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची साफ सफाई करावी आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरवात करावी. तसेच अन्न हे पूर्णब्रम्ह आहे असं आपण म्हणतो.

अन्न भगवंतांचा प्रसाद समजून आपण ग्रहण करतो. हा प्रसाद पवित्र वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. आपले स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावे.

काही स्त्रियांना रात्रीचे उष्टे खरकटे भांडे तसेच किचनवर जमा करून ठेवायची सवय असते. त्या सकाळी उठल्या कि मग रात्रीची खरकटी भांडी धुतात. परंतु हे खूप चुकीचे आहे. रात्री उष्टे भांडे कधीच किचनवर ठेवू नये.

कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. उष्ट्या खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतु आणि किटाणू निर्माण होतात. ते आपल्या किचन चे वातावरण दूषित करतात. परिणामी आपल्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.

म्हणून रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ धुवून पुसून मग किचनची साफसफाई करूनच झोपावे. जर आपल्याकडे कामवाली बाई येणार असेल तरीही किचवर उष्टी , खरकटी भांडी जमा करून ठेवू नये. सर्व भांडी पाण्याने हिसळून त्यातील खरकटे बाजूला काढून ती भांडी किचनच्या बाहेर किंवा गॅलरी मध्ये ठेवावी.

स्वयंपाक झाला कि सर्वात आधी भगवंतांना नैवैद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो. कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंतांना नैवैद्य देऊ शकतो.

घरातील सर्वांना अशीच सवय लावावी कि स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करून नये म्हणजे आपल्या स्वयंपाक घराचे पावित्र्य राखले जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचे वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here