नमस्कार मित्रांनो
मित्रानो अस म्हणतात की स्वप्न भविष्याकडे इशारा करतात, ज्या गोष्टी आपण स्वप्नात बघतो त्या आपल्याला कुठे ना कुठे भविष्यात होणाऱ्या घटनांपासून सूचित करतात.
भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला स्वप्नात किन्नर दिसले तर काय घडते याविषयी सांगणार आहे. किन्नरांना बघणे हे शुभ ही मानले जाते आणि अशुभ ही.
तुम्ही कशा प्रकारे किन्नरला स्वप्नात बघता त्यावर हे अवलंबून असते. जर तुम्ही स्वप्नात किन्नरला पैसे देत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जीवनात लवकरच धन लाभ होणार आहे.
असंही म्हणतात की तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर खऱ्या आयुष्यात सुद्धा किन्नरांना पैसे द्यावे. किन्नर स्वप्नात येणे या गोष्टीचे देखील प्रतीक मानले जाते की आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीची कमी भासणार आहे.
आपल्याला तर माहीतच आहे की किन्नरांचे पूर्ण जीवन अपूर्ण मानले जाते आणि जर आपल्याला स्वप्नात किन्नर दिसले तर अस मानतात की आपल्या जीवनात काहीतरी अपूर्णता येणार आहे.
जर तुम्ही किन्नर ला स्वप्नात काही अपशब्द बोलताना बघितलं असेल, शिव्या देताना बघितलं असेल तर हे तुमच्या जीवनात येणाऱ्या हानीचे संकेत देतात.
अस स्वप्न जर तुम्ही पाहिले असेल तर तुमच्या जीवनात प्रेमाची हानी , पैशांची हानी किंवा इतर मोठे नुकसान होऊ शकते. तर काही वेळा किन्नरांना स्वप्नात बघणे शुभ मानले जाते तर काही वेळा अशुभ मानले जाते.
स्वप्नात किन्नर नाचताना दिसणे म्हणजे शुभ मानले जाते. हे स्वप्न तुमच्या घरात येणाऱ्या आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या स्वप्नामुळे तुम्ही आनंदी असले पाहिजे.
मित्रांनो, स्वप्नात किन्नर मृत दिसण्याचा अर्थ अशुभ मानला जातो. हे स्वप्न दुर्दैवी असल्याचे म्हटले जाते कारण हे स्वप्न घरातील एखाद्या सदस्याला होणार्या घातक आजाराचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे.
स्वप्नात किन्नर भांडण करत असतील तर याचा अर्थ अशुभ मानला जातो. हे स्वप्न अपयशाचे लक्षण आहे. तुमच्या कामात तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
स्वप्नात किन्नरांकडून आशीर्वाद घेणे किंवा किन्नरांचा आशीर्वाद मिळताना पाहणे शुभ मानले जाते. तुमचे सर्व संकट दूर होणार आहेत. तुमच्या कामात जे काही अडथळे असतील, ते दूर होणार आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.