कावळे सांगतात कधी येईल धन आणि कधी येईल मृत्यू. हे आहेत शकुन आणि अपशकुन

0
35

नमस्कार मित्रांनो

मित्रानो कावळ्यामध्ये अदभूत शक्ती असते अस मानल जात. कारण या कावळ्यांना येणारा काळ कसा असणार आहे हे आधीच समजत. अस म्हणतात की कावळे हे दोन जगात राहतात. एक म्हणजे मृत्यू नंतरच जग आणि नंबर दोन म्हणजे वर्तमान जीवन, अशी श्रुष्टि ज्यामध्ये आपण जगत आहोत.

आपले पूर्वज कावळ्यांद्वारे आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात आणि येणाऱ्या संकटा विषयी आपल्याला सतर्क करत असतात. आणि म्हणूनच पिढ्यान पिढ्या कावळ्याच्या शुभ अशुभ शकुणा विषयी चर्चा चालू आहेत.

शकुन शास्त्रात सुद्धा कावळ्या विषयीचे उल्लेख आढळतात. चला तर मग पाहूयात कि कावळ्याच्या कोणत्या गोष्टी शुभ असतात आणि कोणत्या गोष्टी अशुभ.

मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या घरावर कावळ्यांची झुंड आलेली असेल आणि ते कावळे सतत भांडत करताना दिसत असतील तर त्या घराच्या मालकावर लवकरच मोठ संकट येणार आहे अस समजाव.

दुपार होण्यापूर्वी आपल्या घराच्या पूर्वे दिशेला किंवा उत्तर दिशेला असणाऱ्या झाडावर बसून जर कावळे ओरडत असतील तर तो दिवस आपल्यासाठी खूप लाभदायी ठरतो. त्या दिवशी आपल्याला मोठा फायदा होणार असतो.

आपल्या घराच्या छतावर बसून दक्षिण दिशेकडे तोंड करून जर कावळा ओरडायला लागला तर ही गोष्ट अत्यंत अशुभ समजली जाते आणि अशा घरातील ज्या व्यक्ती असतात त्यांना मृत्यूतूल्य कष्ट पडतात.

तुम्ही प्रवास करत असताना जर तुम्हाला एखाद्या भांड्यात पाणी पिताना कावळा दिसला तर तुम्ही ज्या कामासाठी निघालेले आहेत त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत. तसच धन लाभ होण्याचे सुद्धा चान्सेस असतात.

एखादा कावळा जर तोंडामध्ये भाकरी किंवा मांसाचा तुकडा घेताना तुम्हाला दिसला तर मित्रांनो ही एक खूप शुभ अशी घटना असते. कारण तुमची एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

एखाद्या कावळ्याने जर तुमच्या अंगावरती घाण केली तर समजून जा की तुम्हाला भविष्या मध्ये शारीरिक आणि मानसिक पिडेला सामोरे जावे लागणार आहे.

एखाद्या कावळ्याचं डोक्यावर बसणं. मित्रांनो ही घटना अतिशय शुभ मानली जाते. कारण कावळा डोक्यावर बसल्यान लवकरच आपल्याला मोठी धन प्राप्ती होणार आहे. धन प्राप्तीचे योग येणार आहेत अस मानतात.

सकाळी कावळ्याच्या पायाचा स्पर्श होणे. मित्रांनो जर सकाळी कावळ्याच्या पायाचा स्पर्श झाला तर अशा व्यक्ती जीवनामध्ये लवकरच मोठी प्रगती करतात. तसच त्यांना धन धान्याचा लाभ होतो. त्यांच्या घरातील धन वाढत.

सूर्योदय होताना घराजवळ कावळ्यांनी कावकाव करणे. मित्रांनो सूर्य उगवल्या नंतर तुमच्या घराजवळ बसून एखादा कावळा जर सतत काव काव करत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरी लवकरच अतिथी म्हणजेच पाहुणे येणार आहेत.

रस्त्याने चालताना जर एखाद्या कावळ्याने तुमच्या समोर लाल रंगाची वस्तू टाकली तर मित्रांनो ही अत्यंत अशुभ घटना आहे. तुम्हाला लवकरच कोर्ट कचेरीचे प्रसंग किंवा पोलीस केस या सारख्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here