कन्या रास : अशी खुशखबर मिळेल कि आयुष्य बदलून जाईल.

0
849

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो येत्या २०-२१-२२ जानेवारी दरम्यान तुम्हाला मिळेल मोठी खुशखबरी. होतील तीन मोठे चमत्कार. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कन्या राशीच्या जातकां बद्दल. या दिवसात तुम्हाला कोणती खुशखबरी मिळेल? कोणत्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती बघू. तुम्ही कन्या राशीचे साल तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

२० जानेवारीस माघ मास द्वितीया तिथि आहे तसेच २१ ला तृतीया आणि २२ ला चतुर्थी. चंद्र दोन राशींत असेल.. सिंह रास आणि कन्या रास. म्हणजेच कन्या राशीच्या बाराव्या भावात आणि स्वतःच्या राशीत लग्न मध्ये चंद्र गोचर करेल.

दरम्यान हे शनी सोबत युती करून बुधासोबत बुध्दादित राजयोग निर्माण करतील. म्हणजे कन्या राशीच्या पंचम भावात तीन ग्रहांची युती आहे. जे विशेष राजयोग आणि धन निर्माण करण्याचे संकेत आहे.

या तीनही दिवस राहू तुमच्या भाग्य भावात वृषभ राशीत तर केतू तिसर्‍या भावात म्हणजे वृश्चिक राशीत असतील. गुरु सहाव्या घरात कुंभ राशी मध्ये गोचर करतील. हे होते काही ग्रह गोचर परिस्थिती.

या तीन दिवसात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अत्यंत चांगला लाभ होत असल्याचे दिसून येईल. दीर्घ काळापासून रखडलेल्या प्रमोशन सारख्या गोष्टी मार्गी लागतील. तुम्हाला पगारा संबंधी नक्कीच काही खुशखबर मिळेल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ताळमेळ जुळवून घ्याल तर तुमचे प्रमोशन लवकर होईल आणि कामात त्यांचा सहयोग लाभेल. दरम्यान स्थानांतराचे योग आहेत. नोकरी बदल अथवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मोठे चमत्कार बघायला मिळतील, यात तुम्हाला सफलता प्राप्त होईल.

उद्योगात व्यापारात पहिल्यापेक्षा जास्त नफा होईल. नवीन आवक वाढेल. काही नवीन मोठ्या डील्स फायनल होतील. धनप्राप्तीत वृद्धी होईल.अडखळलेली कामे मार्गी लागतील. बँकेतून मोठे कर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे.

हा दुसरा मोठा चमत्कार बघायला मिळेल कारण याने तुमची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच शिवाय वित्तीय बाबत सुधारणा होईल. आजवर कधीही मिळाले नाहीत असे विशेष लाभ प्राप्त होण्याचे योग या दरम्यान आहेत. प्रत्येक दृष्टीने परिस्थिती चांगली होत आहे.

२०-२१ जानेवारी परदेशी यात्रा संभवतात किंवा परदेशी कंपन्यांकडून लाभ होईल. २२ जानेवारी ला विशेष लाभ होईल कारण या दिवशी चंद्र लग्न राशीत गोचर करतील. यामुळे तुमचे मानसिक संतुलन ठीक राहील जे आजवर बिघडलेले होते.

दवाखान्यांचे खर्च कमी होतील. पण काही खर्च वाढतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील लोकांचा सपोर्ट राहील. बहीण भावंडातील वाद मिटून नात्यात मधुरता येईल.

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. प्रेमात असलेल्याना देखील हा काळ चांगला आहे. विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासात नीट लक्ष दिले तर पुढे विशेष मोठे फायदे होतील.

कन्या राशीच्या लोकांनी २० व २१ जानेवारी रोजी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. बाहेरील पदार्थ खाऊ नका. डोळ्यांच्या तक्रारी संभावतात. या दरम्यान नवीन गाडी वाहन खरेदी करण्याचे योग दिसत आहेत.

अनेक दिवसांपासून चालत आलेल्या समस्यांना आता लगाम लागेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. अनेक योजनांचा लाभ होईल. हळूहळू परिस्थिती बदलून सुधारणा होईल. समाजात मानसन्मान वाढेल.

या दरम्यान तुम्ही आवर्जून विष्णुसहस्रनामाचा पाठ करा आणि सूर्यदेवांना सकाळी जल वहा. गणपतीला मोरपंख, धणे आणि सिंदूर अर्पण करा. गाईस चारा घाला. खुप फायदा होईल. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत..! शुभं भवतु!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here