नमस्कार मित्रानो श्री स्वामी समर्थ
मित्रानो पूजा हि अशी गोष्ट आहे जी केल्याने देव प्रसन्न होतात. देवाची पूजा जवळजवळ प्रत्येक हिंदू धर्मातील घरात केली जाते. घरी पूजा केल्याने अनेक फायदे होतात. यामुळे घरात समृद्धी राहते. कुटुंबात शांती राहते.
यासोबतच उपासनेमुळे दुःख आणि समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. मात्र पूजेला बसण्यापूर्वी काही खास गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशी काही कार्य करून जर तुम्ही पूजा केली तर तुमची पापात शामिल होऊ शकता.
अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनात दुःखाचे कारण होऊ शकतात. चला तर वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या केल्यानंतर देवपूजेला बसू नये.
मांसाहार
मित्रानो जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार करत असाल तर मांसाहार केल्यानंतर पूजेला बसू नका. असे करणे तुमच्यासाठी हानीकारण ठरू शकते. देवांना सर्व प्राणी प्रिय आहेत. माणसांसोबतच प्राणी सुद्धा यात येतात.
हेच कारण आहे कि जेव्हा तुम्ही मांसाहार करून पूजेला बसता तेव्हा देव तुमच्यावर क्रोधीत होऊ शकतात. त्यामुळे मांसाहार करून देवपूजा करणे टाळा. सोबतच रोजची पूजा देखील मांसाहार करण्यापूर्वी करावी.
शौच विधी
मित्रानो आपण सर्वच जण सकाळी लवकर उठून टॉयलेट मध्ये जातो आणि त्यानंतर आंघोळ करून शुद्ध होतो. यानंतर देवपूजा करण्यात कोणतीही अडचण येते नाही. मात्र काही वेळा असे घडते कि अंघोळ केल्यानंतर पुन्हा शौचास जावे लागते.
अशा वेळी पुन्हा स्नान केल्याशिवाय पूजेला बसू नये. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा तुम्ही टॉयलेट मध्ये जाल त्यानंतर आंघोळ करूनच देवपूजेला बसा. टॉयलेट मध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे स्नान करून स्वतःची शुद्धी करूनच पूजा विधी करावे.
भांडण
मित्रानो उपासना नेहमी शांत चित्ताने केली जाते. दुखी किंवा संतप्त अंतकरणाने देवपूजा कधीही करू नये. जेव्हा तुम्ही कोणाशी भांडता तेव्हा तुमचे मन एकचित्त नसून विचलित असते. तुमचे विचार त्यावेळी शुद्ध नसतात.
अशात जर पूजा केली तर पूजेमध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे भांडण झाल्या झाल्या पूजेला बसू नये. असे केल्यास देव क्रोधीत होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
घाणेरडे काम
मित्रानो जर तुम्ही असे कोणतेही काम करत असाल ज्यामुळे तुमचे शरीर आणि कपडे घाण झाले असतील तर अशा स्थितीत पूजेला बसू नका. बसायचं असेल तर आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून मगच पूजेमध्ये सहभागी व्हा.
घाणेरडी कपडे , अस्वच्छ कपडे घालून पूजेला बसने अशुभ मानले जाते. याच माध्यमातून तुम्ही नकारात्मक ऊर्जा देवघरात आणि देवाजवळ घेऊन जाता. त्यामुळे नेहमी स्वच्छ शरीर आणि स्वच्छ कपडे घालूनच देवपूजा करावी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.