रोज ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांनो एकदा हे बघा…

0
15416

नमस्कार मित्रानो

मित्रानो आपल्यापैकी बरेच जण रोज ज्वारीची भाकरी खात असतील तर काहींना ज्वारीची भाकरी असते हे देखील माहित नसेल. मित्रानो एक काळ असा होता कि आपल्या आहारात ज्वारी हि नित्य असायची सोबत बाजरी देखील असायची.

आजकाल आपण बघत असाल तर सर्वत्र गव्हाचं अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. परंतु मित्रांनो हि जी ज्वारी आहे त्याचे अनेक फायदे आपल्याला होतात. तर मित्रानो ज्वारीची भाकरी तुम्ही खात असाल किंवा खात नसाल तरी हि माहिती तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

मित्रानो ज्वारीची भाकरी खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जे लोक ज्वारीची भाकरी खातात किंवा ज्वारीने बनवलेले अन्य पदार्थ खातात त्यांना ब्लडप्रेशर आणि हृदयाशी संबंधित रोग होत नाहीत.

याच कारण म्हणजे या ज्वारी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच प्रमाण भरपूर आहे. तसेच या मध्ये जे मिनरल्स आहेत त्यामुळे आपले ब्लडप्रेशर कंट्रोल मध्ये राहते. आपलं हृदय स्वस्थ राहत.

मित्रांनो आजकाल प्रदूषण फार वाढलय. तसेच आपले आयुष्य अगदी दगदगीच बनलंय. प्रत्येक जण धावपळ करत असतो आणि याचा सर्वात मोठा फटका हा महिलांना बसलाय.

आणि मग महिलांच्या ज्या समस्या आहेत जसे कि गर्भाशय , प्रत्येक महिन्याच्या समस्या या गोष्टी होऊ नयेत त्यांचं आरोग्य चांगलं राहवं यासाठी ज्वारी मदत करते. म्हणून महिलांनी खासकरून ज्वारीची भाकरी नक्की खायला हवी.

मित्रानो या ज्वारी मध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ देखील आहेत जे आपले पोट साफ करण्यास मदत करतात. म्हणून जर तुम्हाला ऍसिडीचा त्रास असेल , पचन व्यवस्थित होत नसेल अपचनाचा त्रास असेल तर मित्रानो चपाती सोडून द्या. आजपासूनच आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करा.

ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे या ज्वारीच्या सेवनाने मूळव्याधीचा त्रास देखील कमी होतो. मित्रानो लठ्ठपणा आजकाल भरपूर वाढलाय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अनेक आजारांना निमंत्रण द्यायचं काम हा लठ्ठपणा करत असतो.

तुम्ही जर चपाती सोडून हि ज्वारी जर स्वीकारलीत तर मित्रानो आपल्या शरीरातील अतिरिक्त जी चरबी आहे ती वितळण्यास मदत होते , लठ्ठपणा आपला कमी होतो. जर तुम्ही लठ्ठ नसाल तरी सुद्धा ज्वारी खा आयुष्यात कधीच लठ्ठपणा तुम्हाला जाणवणार नाही.

मित्रानो या ज्वारी मध्ये लोहाचं प्रमाण सुद्धा खूप प्रमाणात आहे. म्हणून ज्यांना पंडुरोग म्हणजेच ऍनिमियाचा त्रास आहे , ज्यांना थोडं काम करून लगेच थकवा येतो अशा लोकांनी ज्वारीची भाकरी अवश्य खावी.

ज्यांना मधुमेह , डायबेटिज आहे अशा लोकांसाठी तर ज्वारी वरदान आहे. कारण ज्वारी खाल्याने आपल्या शरीरातील इन्सुलिन ची लेव्हल आहे ती कंट्रोल मध्ये राहते. म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांनी नियमित ज्वारीचे सेवन करावे.

ज्वारीचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची जी लेव्हल आहे ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि मग हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताची पातळी हि ज्वारी नियंत्रित ठेवते.

मित्रानो शेवटचा फायदा म्हणेज ज्वारी मध्ये असे काही पोषक तत्वे आहेत कि ते किडनी स्टोन होऊ देत नाहीत. म्हणून जर तुम्हला किडनी स्टोनचा त्रास असेल किंवा तो होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर मित्रानो आपल्या आहारात ज्वारीचा नक्की समावेश करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here