घराजवळ जास्वंद असेल तर हे करा. अचानक पैसा घरात येईल. 3 दिवसात चमत्कार बघा.

0
24276

नमस्कार मित्रानो

मित्रानो अनेकांच्या दारा समोर , आजूबाजूला जास्वंदाचं झाड असत. वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्वंदाचे झाड असणे शुभ आहे कि अशुभ ? मित्रानो जास्वंद लावायचं असेल तर त्यासाठी शुभ दिशा कोणती ? याच संबंधित आज आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रानो जास्वंदाच्या फुलाचा एक अत्यंत प्रभावशाली तोडगा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या जीवनात पैशांची कमतरता दूर होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी घरात येते.

जास्वंदाचे फुल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे. तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल , सूर्यकिरणे पडतील याची काळजी नक्की घ्या.

जी व्यक्ती जास्वंदाचं फुल तांब्या भर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत. त्या व्यक्तीचे हाडे मजबूत राहतात. अशा व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते.

यश , कीर्ती या गोष्टींची प्राप्ती तिला आपोआपच होते. मित्रानो वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष दूर करण्यासाठी , संपत्तीच्या कधी बाधा असतील , जमीन जुमल्या बद्दल काही वाद विवाद चालू असतील किंवा कायद्याविषयी कुठल्या गोष्टीत यश मिळवायच असेल तर जास्वंदीचं फुल मारुतीरायांना नक्की अर्पण करा.

मारुतीरायांना अर्पण करणे शक्य नसेल तर माता दुर्गेश आपण हे फुल अर्पण करू शकता. जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. जास्वंदाचं फुल हे देवीस अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच ज्यांना धन , वैभव , पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची दूर करायची असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीस फुल नक्की अर्पण करा.

जास्वंदाचं फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेस किंवा हनुमानजींना अर्पण केल्यास अनेक प्रकारच्या ग्रह पीडा शांत होतात. मित्रानो अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचं फुल अत्यंत प्रिय आहे. सोबतच गणपती बाप्पांना सुद्धा जास्वंदीचे फुल अतिशय प्रिय आहे.

विनायक चतुर्थी , संकष्टी अशा विशेष दिनी हे फुल गणपती बाप्पाना अर्पण करत जा. त्यामुळे दीर्घायुष्य लाभून उत्तम आरोग्य लाभते. मित्रानो रविवारच्या दिवशी आपण हा तोडगा करायचा आहे. गणपती बाप्पाना फुल अर्पण करायची आहेत. फुले अर्पण करताना ती ८ असावीत आणि लाल रंगाचीच असावीत.

दिवसभर ती फुले गणपती बाप्पांच्या चरणी असतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ती ८ फुले उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायची आहेत. आणि त्यानंतर साधारण ५ ते ७ दिवस ती फुले सावलीत सुकवायची आहेत.

५ दिवस सुकवून झाल्यानंतर त्याची बारीक पावडर बनवायची आहे. पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि सिंदूर टाका. आता जो घोळ बनला आहे तो टिळा म्हणून आपल्याला वापरायचा आहे. महत्वाचे काम कराल तेव्हा याचा टिळा लावायचा आहे.

जास्वंदाच्या फुलाची पावडर , थोडासा कपूर आणि थोडासा सिंदूर या सर्वांचे मिश्रण आपल्या कपाळी टिळा स्वरूपात लावायचं आहे. तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होणार. समोरची व्यक्ती तुम्हाला नाही म्हणूनच शकणार नाही.

दररोज टिळा लावा. विरोधी शांत होतील , शत्रू शांत होतील , प्रत्येक कामात यश मिळू लागेल. जास्वंदाचं झाड नक्की कुठे लावावं. मित्रानो वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कोणत्याही दिशेला लावू शकता. मात्र झाडावर सूर्य प्रकाश पडेल याची काळजी घ्यायची आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here