भाग्यशाली महिलांच्या शरीरावर असतात या खुणा…सामुद्रिक शास्त्र

0
4890

नमस्कार मित्रांनो

मित्रानो महिलांच्या शरीरावर या खुणा असतील तर हे चिन्ह तिला बनवतात भाग्यशाली. आज आम्ही तुम्हाला महिलेच्या शरीरावर असणाऱ्या खुणांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे ती महिला भाग्यशाली बनते.

सामुद्रिक शास्त्र हे असे शास्त्र आहे ज्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीची शारीरिक बनावट, हाव भाव व शरीरावरील काही विशिष्ट चिन्हांवरून त्याच्या चारित्र्याचे आकलन करू शकतो.

सामुद्रिक शास्त्रात या विशिष्ट चिन्हांचे आकलन केल्याने व्यक्तीचे वर्तमान आणि भविष्य समजते त्याचबरोबर व्यक्तीचा स्वभाव व चारित्र्याचे व्यवस्थित आकलन केले गेले आहे.

मित्रांनो महिलांना समजणे अवघडच नाही तर अशक्य आहे. पण सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांचे हे रहस्य आपण सहजपणे जाणून घेऊ शकतो. स्त्रियांच्या शरीरावर काही असे चिन्ह असतात ज्यावरून आपण हे ओळखू शकतो की ती आपला पती आणि सासरच्यांसाठी किती भाग्यशाली आहे.

सामुद्रिक शास्त्राची रचना करणारे महर्षी समुद्र यांच्या नुसार अंकुश, चक्र आणि कुंडल हे राजयोगाचे निशाण असतात. ज्या महिलेच्या तळव्यावर अंकुश, चक्र किंवा कुंडल यापैकी काही निशाण दिसतो ती एक चांगली शाशीका बनून राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते.

या महिलेच्या वाणीत एक वेगळ्या प्रकारची चमक असते. असे निशाण जर एखाद्या स्त्री च्या शरीरावर असतील तर ती स्त्री सासरी खूप प्रिय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करते.

एखाद्या स्त्रीच्या हातावर मासा, तलाव, छत्र, अंकुश हे चिन्ह असतील तर ती महिला उत्तम असते. असे चिन्ह असणाऱ्या स्त्रीला राजयोग प्राप्त होतो. अशा महिलेला जीवनभर धनलाभ होत राहतो आणि अशी स्त्री एक उंच पद प्राप्त करते.

अशा महिलेजवळ अनेक प्रकारची धन संपदा असते. अस मानतात की हे चिन्ह करोडो मध्ये एखाद्या स्त्रीला असतात. शक्ती, बाण, रथ चक्र आणि ध्वजलाही राजयोग चे लक्षण म्हणून बघितले जाते. ज्या स्त्रीच्या मध्यभागी हातावर हे चिन्ह असतात तिला शासन करण्याची मोठी संधी मिळते आणि त्याचा या स्त्रिया लाभही घेतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here