श्राध्द केले की, कावळ्यालाच का खाऊ घातले जाते…जाणून घ्या खरे कारण.

0
858

नमस्कार मित्रानो

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.

जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा “मनुष्य” लाऊ शकतो परंतु फक्त “वड” आणि “पिंपळ” या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे “विष्ठा” करतात तेथेच “वड” किंवा “पिंपळ” हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त “भाद्रपद” महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना “घराघरातून” पोषक आहार या काळात “प्रत्येक” “सु-संस्कारी” मानवांनीच दिला ? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच “संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील “ऋषि-मुनि” हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल “विद्वान”होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार “कावळ्यांना” देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.

आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं “पितृपक्ष” आला की “कावळ्यावर” टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो.

प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. खबरदार जर कोणी “आपल्या” प्रथांची टींगल केली आणि “ऐकून” “पाहून” सहन केली तर . त्याचे पण त्याच्याच समोर “श्राध्द” करा.

नाही तरी “कोरोनाने” मागे “आँक्सीजन” बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून “पितरांच्या” नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील “वंशाचे” नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा.

कधीच , कुठेही , कोणतेही सरकार “आँक्सीजनची” पुर्व तयारी करा हे सांगणार नाही . हेच “वैज्ञानिक” स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा…माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू . आज आम्ही “हजारो” रूपये देऊन लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच. पण भविष्यात नातू-पणतु “लांखो” रूपये देतील की करोंडो” देतील हे ती वेळच ठरवेल. श्री स्वामी समर्थ

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here