नमस्कार मित्रांनो
मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटत की आपले नशीब खराब आहे, माता लक्ष्मी आपल्यावर रुसली आहे. तर आपल्या नसलेल्या नशीबाला व रुसलेल्या लक्ष्मीला परत आणण्यासाठी आज एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुमचे नशीब बदलून जाईल.
ही एक साधारण वस्तू आहे, मित्रांनो प्रत्येकाच्या घरी हिंग तुम्हाला सहजपणे मिळते. हिंगाचा वास हा खूपच मनमोहक असतो. जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी हिंगाचा उपयोग होतो.
राहू आणि केतु हे खूप उग्र ग्रह आहेत, कमी लोकांना माहीत आहे की जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत राहू, केतु बलवान असतात तेव्हा लॉटरी लागण्याचे प्रबळ योग बनतात. म्हणजे अचानक धन मिळणे किंवा धन मिळण्याचे मार्ग मोकळे होतात.
राहू आणि केतु जेव्हा तुमच्या कुंडलीत प्रबळ असतात तेव्हा असे योग बनतात. जेव्हा राहू आणि केतु बलवान असतात तेव्हा असे लोक स्वतःमध्येच मायावी शक्ती परिधान केलेले असतात.
राहू, केतु जितके क्रूर असतात तितकेच रहस्यमय असतात आणि अशा लोकांवर माता लक्ष्मी अचानक मेहेरबान होते आणि धनाची प्राप्ती होते.
आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो केल्याने राहू, केतु तर बलवान होतातच शिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धन येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. ज्योतिष शास्त्रपासून ते तांत्रिक शास्त्रपर्यत हिंगाचे असे टोटके सांगितले जातात जे केल्याने व्यक्तीवर पडणारी वाईट नजर नष्ट होते.
काही वेळा व्यक्तींना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः मिळवलेले पैसे पुरत नाहीत. अशा परिस्थितीत तो व्यक्ती कर्ज घेतो आणि कर्ज हा एक असा आजार आहे जो एखादा व्यक्ती घेतला तर त्यामध्ये तो अडकतच जातो. ते परत करण्यासाठी त्याला खूप समस्या येतात आणि काहीवेळा तर तो ते कर्ज परतच करू शकत नाही.
दिवसेंदिवस मानसिक दृष्टीने चिंतेत असाल तर बाजारातून स्वच्छ हिंग घेऊन या, एक चिमुट हिंग रोजच्या अंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्याने अंघोळ करा. काही वेळातच तुम्हाला फरक दिसून येईल. हा जो उपाय आहे तो चमत्कारिक आहे.
कधी कधी आपल्याला स्वतःच्या घरातच एकटे वाटू लागते, कधी कधी घरात विनाकारण भांडण होतात त्याचबरोबर आपल्या आसपास कोणीतरी असल्यासारखे वाटते.
कित्येकदा घरातील लहान मुले रात्री स्वप्न पाहिल्यानंतर घाबरून उठून बसतात. तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर तुम्ही काय करणार?
यासाठी तुम्हाला थोडा कापूर बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चिमुट हिंग आणि काळी मिरी बारीक करून घालायची आहे आणि त्यामध्ये तूप घालून त्याची गोळी बनवून घ्यायची आहे.
सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी कापराची एक वडी घेऊन त्यावर ती गोळी ठेऊन तो कापूर घराच्या अंगणात जाळून टाका. निगेटिव्ह एनर्जी, बाधा, नजरदोष हे सर्व दूर होईल.
घरातून कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जात असाल किंवा कोर्टात एखादी केस चालू असेल तर हे काम होण्यासाठी हा छोटासा उपाय करा. अशा समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आणि आपले सर्व काम होण्यासाठी तुमच्या उजव्या हातात थोडंस हिंग आणि काळीमिरी घ्या.
त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला ते फेकून द्या. त्याच्याकडे न बघता डाव्या हाताला ते टाकून द्या व तुमच्या कामासाठी जा तुमचे काम पूर्ण होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.