कोमट पाण्यात घ्या एक चमचा.नेहमी तरुण रहाल.पोट साफ,शुगरसाठी औषध बंद, वजन कमी.!

0
306

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो असं म्हणतात ज्या व्यक्तीचे नियमितपणे पोट साफ होते त्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही आणि आरोग्य ठीक असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणीही नाही. त्यासाठी आजचा हा उपाय आयुर्वेदामध्ये रामबाण उपाय मानला आहे.

खाल्लेले अन्न पचत नसेल, गॅस होत असेल, करपट ढेकरा येत असतील , पित्त वाढले असेल, छाती मध्ये कफ साचला असेल, खूप औषधे घेऊनही वेळेवर पोट साफ होत नसेल तर हि माहिती तुमच्यासाठीच आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या उपायाने पोट साफ होऊन पोटावरील चरबी कमी होऊन वजन कमी होते. भूक चांगली लागून पचन शक्ती वाढते. कुणाला मधुमेहाचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. साखर नियंत्रणात राहते. ही गुणकारी पावडर कशी बनवावी आणि याचा वापर कसा करावा हे आपण आज पाहणार आहोत.

ही पावडर बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होते. पतंजली स्टोअर किंवा ऑनलाईन आयुर्वेदिक दुकानातून तुम्ही खरेदी करू शकता. पावडर आहे हिरडा या वनस्पतीची. हिरड्याला हिंदीमध्ये हरड /हरितकी असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये Chebulic Myrobalan असे म्हणतात. तर संस्कृत मध्ये अमृत असे म्हणतात.

कारण याचे गुणधर्म अमृताप्रमाणे आहेत. त्यामुळे माणसाला म्हातारपण लवकर येत नाही आणि दीर्घायुष्य मिळते. एखाद्या व्यक्तीस म्हातारपण आले असेल तर ते दूर होते.

एका आयुर्वेदिक पुस्तकात सांगितल्याप्रमाणे गूळ, मध, सुंठ, पिंपळी आणि सैंधव मीठ या पैकी एक घटक आणि 2 ग्रॅम हिरडा यासोबत एकत्रित रोज सेवन केले असता म्हातारपण कधीच येत नाही. आणि अकाली म्हातारपण आल्यास ते नाहीसे होते. अशा या गुणकारी हिरड्याची पावडर तुम्हाला जिथून उपलब्ध होईल तेथून विकत घ्या.

जर तुमच्याकडे हिरड्याचे फळं असेल तर ते तुम्ही भाजून घ्या आणि नंतर त्याचे साल काढून त्या फळांची बारीक पावडर बनवून घ्या. आता एक ग्लास पाणी घ्या. ते कोमटसर गरम करा. खुप गरम करू नये.

हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोमट पाणी. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपण एक चमचा हिरडा पावडर टाकावी.

या उपायासाठी दुसरा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे सैंधव मीठ/Rock salt.. चिमूटभर सैंधव मीठ घेऊन ते या मिश्रणात टाकावे. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्याचे सेवन करा.

या उपायामुळे आपल्या पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतील. लहान मुलांसाठी हा उपाय करत असाल तर त्याचे प्रमाण अर्धे ठेवावे. उपाय 100% खात्रीशीर आहे. फरक पडल्यास हा उपाय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here