नमस्कार मित्रानो
मित्रानो 2022 मध्ये गुरुपौर्णिमेला 4 अत्यंत शुभ संयोग बनत आहेत. हे योग या 3 राशींसाठी नशीब उघडणारे सिद्ध होतील. त्यांना भरपूर पैसा मिळेल आणि त्यांच्या कामात त्यांची प्रगती होईल.
13 जुलै 2022 रोजी म्हणजेच उद्या गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जाईल. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस असून ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे.
गुरु पौर्णिमेला 4 राजयोग बनत आहेत त्यामुळे या 3 राशीच्या लोकांचे भाग्य उजळून निघणार आहे. 13 जुलै 2022 रोजी दिवशी मंगळ, बुध, गुरु आणि शनि शुभ स्थितीत आहेत.
यामुळे ते रुचक, भद्रा, हंस आणि शष नावाचे चार राजयोग बनवत आहेत. याशिवाय या दिवशी बुधादित्य योगही तयार होत आहे. बनत असलेल्या या संयोगामुळे या 3 राशीच्या लोकांची लॉटरी लागणार आहे. यांना या सर्व योगांचा सर्वाधिक फायदा होईल.
गुरुपौर्णिमेला या राशीच्या लोकांचे नशीब उजळणार
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा योग अतिशय शुभ सिद्ध होईल. त्यांना अनेक मार्गानी पैसा मिळेल. अचानक तुम्हाला कुठूनतरी भरपूर पैसे मिळतील. अडकलेला पैसा परत मिळेल. व्यापाऱ्यांनाही व्यापारात फायदा होईल. नुसत्या बोलण्याने तुम्ही अनेक गोष्टी कराल. हा काळ तुमची प्रतिष्ठा वाढवणारा काळ ठरणार आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनाही गुरु पौर्णिमेचा फायदा होईल. त्यांना पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल. अडकलेले पैसे मिळण्यासोबतच उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होऊ शकते. बचत करण्यात यश मिळेल. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. कामात यश मिळेल.
कन्या रास
2022 च्या गुरु पौर्णिमेला तयार होणारा राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी वरदान सारखा सिद्ध होईल. त्यांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रमोशन, पगारवाढही होऊ शकते. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नवीन करार होऊ शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.