नमस्कार मित्रांनो
मित्रानो श्रावण महिन्यात भगवान शिवजी संपूर्ण कुटुंबासह शिवालयमध्ये राहतात आणि भक्तांच्या प्रार्थनाही ऐकतात. श्रावण महिनाची आपण वर्षभर वाट बघतो आणि आपण भगवान शिवाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असतो.
अशा परिस्थितीत शिवजींची पूजा कशी करावी, त्यांना कसे प्रसन्न करावे, कोणते फूल त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे? आज या सर्व गोष्टी या लेखात सांगणार आहोत. त्याचबरोबर हिरव्या बांगड्यांचे रहस्य काय आहे, त्या कुठे ठेवाव्यात आणि माता पार्वतीचा आशीर्वाद कसा मिळवता येईल हे देखील तुम्हाला कळेल.
मित्रानो भगवान शंकरांना जर तुम्ही चमेली किंवा बेलाचे फुल अर्पण करत असाल तर वाहनाचे सुख प्राप्त होते. आणि जर बेलाचे फुल अर्पण करत असाल तर सुंदर व सद्गुणी पत्नी मिळते.
शमीचे फूल मिळाले तर ते अधिक चांगले नाहीतर त्याची पानेही तुम्ही अर्पण करू शकता. शमीचे फुल अर्पण केल्याने जीवनातील शनी संबंधित समस्या दूर होतात.
घाणेरीचे फुल अर्पण करून भगवान शंकराची आराधना केल्याने अन्न व वस्त्रांची कमतरता भासत नाही. शिवाला धतुर्याची फुले अर्पण केली तर पुत्रप्राप्ती व आज्ञाधारक पुत्र प्राप्त होतो. आणि जर तुम्ही शिवजी यांच्या पूजेत दुर्वा अर्पण करत असाल तर दीर्घायुष्य प्राप्त होते.
लाल जास्वंदचे फूल अर्पण केल्यास तुमचे शत्रू शांत होतात. अपराजिता अर्पण केल्यास सर्व बाजूंनी तुमच्या जयजयकार होतो. अल्सीचे फुल अर्पण करत असाल तर भगवान श्री हरी विष्णूचे सर्वात प्रिय बनता आणि जर तुम्ही कमळाचे फूल अर्पण केले तर जीवनातकाहीही वेगळे करावे लागनार नाही.
म्हणून पूर्ण श्रावण महिन्यात एक दिवस नक्की हे फुलअर्पण करा. अत्तर अर्पण केल्याने शुक्र ही चांगला राहतो आणि सुख प्राप्त होते. केशर अर्पण केले तर वैवाहिक जीवनात सुख मिळते, जीवनात भौतिक सुख समाधान मिळते.
तुम्ही शिवजी यांची पूजा कराच पण सोबतच माता पार्वतीची देखील पूजा करा. जेव्हा तुम्ही आई पार्वतीची पूजा कराल तेव्हा तिला नक्कीच सिंदूर लावा. तुम्ही अविवाहित असलात तरी लावू शकता.
लावल्यानंतर त्याच बोटाने ते सिंदूर स्वतः ला लावून घ्या, विवाहित महिलांनी आपल्या भांगेत लावा आणि अविवाहितांना भांगेत लावायचे नसेल तर कपाळी लावून घ्या आणि माता पार्वती चरणी हिरव्या बांगड्या अर्पण करा. 6 किंवा 8 तुम्हाला जमेल तेवढ्या.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.