नमस्कार मित्रानो
मित्रानो पावसाळ्यात घरांमध्ये गोम प्रत्येकाने अनेकदा पाहिली असेल. परंतु अनेक वेळा पावसाशिवाय घराच्या अनेक भागांत गोम दिसतात. अशात गोम दिसण्याचे वेगवेगळे अर्थ वास्तूमध्ये दिले आहेत. गोम अचानक दिसणे सौभाग्य आणि दुर्भाग्य दर्शवते.
मित्रानो वास्तु तज्ज्ञांच्या मते गोम राहूचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात दिसली तर घाबरून जाऊ नका , तिला मारू नका, तर घराबाहेर सोडून द्या.
असे म्हणतात की शतपद गोम मारल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील राहूची स्थिती कमकुवत होते आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर अशुभ परिणाम होतो.
घराच्या कोणत्याही भागात गोम दिसू शकते. परंतु काही जागा अशा आहेत जिथे गोम दिसते तिथे वास्तू दोष आहे असे समजले जाते. घराच्या जमिनीवर गोम रेंगाळताना दिसली तर समजावे की घरात वास्तुदोष आहे.
त्याच वेळी, स्वयंपाकघरात त्यांचे दिसणे देखील वास्तू दोष सूचित करते. अशा स्थितीत त्यांना उचलून घराबाहेर सोडावे. वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर, शौचालयावर आणि पायऱ्यांवर जर गोम दिसली तर हे कमजोर राहूचे लक्षण आहे.
याशिवाय आगामी काळात कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले जाण्याचे संकेत देतात. असे नाही की गोम फक्त केवळ दुर्भाग्य दर्शवते. उलट, गोम शुभ संकेत देखील देते.
घरातील पूजेच्या ठिकाणी , देव्हाराच्या खोलीत गोम दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जातात. देवघरात अचानक एखादी गोम दिसली आणि क्षणात गायब झाली तर समजून जावं की काही महत्वाचं काम पूर्ण होणार आहे.
वास्तुशास्त्रानुसार, जर घरामध्ये मृत गोम दिसली तर याचा अर्थ असा होतो की एखादे मोठे संकट टळले आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.