गाईला चुकूनही या 3 वस्तू खायला देऊ नका. नाहीतर गरिबी आणि दरिद्रता तुमच्या गळ्यात पडेल

0
4233

नमस्कार मित्रानो

मित्रानो आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचे स्वरूप मानले जाते. गाईमध्ये ३३ कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे आपण मानतो. जर सर्व देवी देवतांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर फक्त गाईचे पूजन आणि सेवा केली तरी सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.

गायीमध्ये देवी लक्ष्मीचे देखील वास्तव्य असते. जे व्यक्ती मनोभावे गाईचे पूजन व सेवा करतात त्यांच्या जीवनात नेहमी सुखसमृद्धी तसेच समाधान नांदते. गाईच्या मुखा मध्ये चारही वेदांचे वास्तव्य असते. गाईचे पूजन केल्यास त्रिदेव म्हणजे ब्रह्मदेव श्रीहरी विष्णू व देवांचे देव महादेवाची कृपा आपल्यावर होते.

श्रीकृष्णांना गोपाल म्हटले जाते कारण ते गाईचे पालन पोषण सेवा व पूजन करीत असत. गाईला पोळी खाऊ घालण्याचे आपली फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. गाईचे पूजन केल्यास देवी लक्ष्मीचे पूजन केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते.

आपण गाईला पोळी खायला देतो म्हणजे साक्षात भगवंताना नैवैद्य दिल्यासारखे होते म्हणून गाईला पोळी जरूर खायला द्यावी. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते परंतु गाईला पोळी खाऊ घालताना या चुका अजिबात करू नका. जर आपण गाईला पोळी खाऊ घालताना या चुका करीत असाल तर आपल्याला त्या बदल्यात पुण्यफळ नाही तर संकटे व अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

म्हणून गाईला पोळी खाऊ घालताना या चुका टाळा. गाईला पोळी खाऊ घालताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे कि गाईला कधीही शिळी पोळी खायला देऊ नये. आपण गाईसाठी पहिली ताजी व गरम गरम पोळी काढून ठेवतो परंतु आपल्याला वेळ नसल्या कारणाने आपण ती पोळी तशीच राहू देतो व आपल्या सवडीप्रमाणे आपण ती पोळी गाईला खायला देतो.

परंतु तोपर्यंत ती पोळी शिळी होऊन जाते आणि अशी शिळी पोळी गाईला खाऊ घालणे अशुभ मानले जाते. आपण पुण्य कमावण्यासाठी गाईला पोळी खायला देतो परंतु जर आपण गाईला शिळी पोळी खायला दिली तर आपण पापाचे भागीदार बनतो.

गाईला आपण देवी मानतो मग आपण देवांना कधी शिळा झालेला नैवैद्य देतो का ? नाही ना , अशा प्रकारे देवी असलेल्या गाईला ताजी व गरम पोळीच खायला द्यावी. गाईला पोळी खाऊ घालतांना दुसरी चूक आपण ही करतो कि आपण गाईला कोरडी पोळी खायला देतो.

म्हणजेच आपण नुसती पोळी गाईला खायला देतो. परंतु गाईला नुसती पोळी खायला न देता त्या पोळीला थोडेसे तूप लावून किंवा चना डाळ गूळ किंवा साखर आपल्याकडे त्यापैकी जे उपलब्ध असेल ते पोळी मध्ये ठेवून गाईला खायला द्यावे. कारण आपण कधी कोरडी पोळी खातो का ? मग गाईला आपण कोरडी पोळी कशी काय देऊ शकतो ?

अशा प्रकारे जर आपण गाईला पोळी खायला दिली तर गोमातेची तसेच सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल व आपण नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहू. गाईला पोळी खाऊ घालण्याचा एक नियम हा आहे कि गाईला नेहमी आपण पोळ्या करताना जी दुसरी पोळी बनवतो ती गाईला खायला द्यावी.

बहुतेक व्यक्ती म्हणतात कि गाईला पहिली पोळी खायला द्यावी , परंतु पहिली पोळी कधीही व्यवस्थित येत नाही तसेच त्या पोळीवर अग्नी देवतेचा अधिकार असतो. म्हणून पहिली पोळी अग्नी देवतेला समर्पित करावी. गाईला कधीही उष्टी किंवा ताटात उरलेली पोळी खायला देऊ नये. हे खूप अशुभ असते.

यामुळे आपल्याला अडचणी व संकटांचा सामना करावा लागू शकतो. गाईला कधीही पोळी खाऊ घालतांना आपल्या हाताने पोळी खाऊ घालावी. कधी कधी आपल्याला गाईची भीती वाटते. मग आपण तेथे गाई समोर पोळी फेकून देतो व बाजूला होतो. परंतु हे खुप चुकीचे आहे.

जर जायला पोळी खाऊ घालतांना आपल्याला गाईची भीती वाटत असेल तर ज्यांची गाय आहे त्यांच्याकडे ती पोळी देऊन ती गाईला खाऊ घालावी. किंवा गाईचे भोजन ज्या पात्रात ठेवले जाते त्या पात्रात ती पोळी ठेवून द्यावी. परंतु गाईला कधीही पोळी फेकून देऊ नये. गाईला पोळी खायला देतांना स्वच्छतेचे पालन करणे खूप आवश्यक आहे.

तसेच गाईला नेहमी सात्विक भोजनच द्यावे. कांदे , लसूण टाकलेले तामसीक भोजन गाईला कधीही खायला देऊ नये. तसेच गाईला हिरवा चारा , भाजीपाला खाऊ घालेणे खूप शुभ असते. परंतु आपण काय करतो आपल्या स्वतःसाठी चांगला भाजीपाला घेतो परंतु गाईलाच टाकायचे आहे त्यात काय एवढे असे म्हणून स्वस्त खराब झालेला , वाळलेला भाजीपाला घेऊन आपण गाईला खाऊ घालतो.

अशाप्रकारे भाजीपाला खायला देण्यापेक्षा गाईला काहीही न टाकलेले खूप चांगले. कारण यामुळे आपण फक्त पापाचे भागीदार बनतो. गाईला गुळ खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे गो पूजनाचे विशेष लाभ आपल्याला मिळतात आणि आपल्या अडचणी व संकटांपासून आपली सुटका होते.

गाईला पोळी व गूळ खाऊ घालण्याबरोबरच पालक खाऊ घालणे देखील शुभ असते. गाईला पालकाची भाजी खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीतील नकारात्मक दोष नष्ट होतात. गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर गाईच्या पायाखालची माती आपल्या कपाळावर लावावी.

असे मानले जाते कि गाईच्या पायाखालची माती कपाळावर लावल्याने तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. या सर्व नियमांचे पालन करून जर आपण गाईला पोळी खाऊ घातली तर आपल्यावर गोमातेचा आशीर्वाद कायम राहतो. ३३ कोटी देवी देवतांची कृपा आपल्यावर होऊन आपण सुखी , समाधानी व संपन्न राहतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here