नमस्कार मित्रानो
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार आहे. ग्लेन मॅक्सवेलची भारतीय मैत्रीण विनी रमणने हा खुलासा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. मॅक्सवेल पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. मॅक्सवेलची होणारी बायको विनी रमण यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघासाठी क्रिकेट खेळतो आणि तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देखील आहे. ग्लेन मॅक्सवेलने गेल्या वर्षी त्याची भारतीय मैत्रीण विनी रमणसोबत भारतीय रीतिरिवाजानुसार साखरपुडा केला होता. आता ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार आहे.

मॅक्सवेलची गर्लफ्रेंड विनी रमणने मॅक्सवेलला त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, ‘ग्लेन मॅक्सवेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्याशी लग्न करण्याची वाट पाहतेय मी , आता धीर धरवत नाही. 2022 हे आपले लग्नबंधनात अडकण्याचे वर्ष असेल. मित्रानो गेल्या वर्षी मार्चमध्ये मॅक्सवेलने भारतीय परंपरेनुसार विनी रमणशी साखरपुडा केला होता आणि सोशल मीडियावर दोघांचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते.
मॅक्सवेल बर्याच काळापासून विनीला डेट करत होता आणि विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर मॅक्सवेल सोबत बरेच फोटो देखील शेअर केले आहेत. 2019 मध्ये, जेव्हा मॅक्सवेलने मानसिक आरोग्य ठीक नसल्याने स्वतःला क्रिकेट पासून दूर केले होते, तेव्हाच विनीने या कांगारू क्रिकेटपटूला या वाईट काळातून बाहेर काढले. ही माहिती मॅक्सवेलने स्वतः दिली होती.
अलीकडेच, आरसीबीच्या पराभवानंतर मॅक्सवेलने सोशल मीडियावर ट्रोलिंगबद्दल एक लांब पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, ‘आरसीबीसाठी हा चांगला सीजन होता. आम्हाला जिथे पोहोचायचे होते तिथे आम्ही पोहोचू शकलो नाही, परंतु आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि हि गोष्ट आमच्यासाठी सकारात्मक आहे.
मॅक्सवेल हा दुसरा असा खेळाडू आहे जो भारतीय मुलीशी विवाह बद्ध होणार आहे. या आधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय वंशाच्या मासूम सिंघाशी लग्न केले होते. दोघेही आयपीएल पार्टी दरम्यान एकमेकांना भेटले आणि लग्नापूर्वी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
मॅक्सवेल आणि विनी 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत. मॅक्सवेलने 2019 च्या सुरुवातीला विनीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्समध्ये नेले. काही महिन्यांपूर्वी हे जोडपे युरोपच्या सहलीला गेले होते. भारतीय वंशाची विनी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल वरून मिळालेल्या माहिती नुसार ती व्यवसायाने फार्मासिस्ट आहे.