नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो कधी कधी घरात विनाकारण वाद होतात, काही वेळेस तर नाती मोडण्यापर्यंत वाद होतात, दवाखान्यात खुप पैसा जातो, लहान मुलं अचानक रडू लागतात दवाखाना करूनही त्यांचं रडणं थांबत नाही, घरातील मुलांचा ताप उतरत नाही, घरातील एका व्यक्तीच डोकं सतत दुखत असतं यासाठी आपल्याला काय करावं हे समजत नाही.
घरात एखादा किडा किंवा जीव आल्यामुळे असे प्रकार घडू शकतात, त्यालाच म्हणतात की कोणीतरी आपल्यावर काहीतरी केलं आहे. तुमच्या घरात जर कोणी शेजारी, नातेवाईक येऊन गेले असतील आणि तुमच्या घरातील वस्तू वगैरे पाहून त्याच्या मनात आले असेल की वा याचे काय आयुष्य आहे.
त्यालाच नजर लागणे अस म्हणतात. नजरदोष सुद्धा माणसाला खूप त्रास देतात, कोणी कोणी करणी बाधा या गोष्टींवर विश्वास ठेवतात. कधी कधी घरामध्ये आपण छोटासा भोवरा पाहतो आणि छोटस होल करून राहतो.
तो कीडा आपल्या चेहऱ्यावर, कानापाशी कुठेही येऊन आवाज करतो आणि तो जर घरातून जात नसेल तर अस समजावं की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे घरात वटवाघूळ येणं, हे देखील तितकच वाईट आहे. गाईला, कुत्र्याला जस भूकंप येणार हे समजतं त्यामागे जस शास्त्रीय कारण आहे त्याचप्रमाणे किडे हे जीव आहेत ते काहीतरी वाईट होणार असेल तर येतात,म्हणजे कुठेतरी वाईट शक्ती असेल तर येतात.
तुमच्या दारातील तुळशीला व्यवस्थित पाणी, ऊन मिळत असेल आणि तरीही ती वरचे वर सुकत असेल तर काही ना काही तुमच्या घरामध्ये चुकतंय आणि यावर तुम्हाला ईलाज करायचे आहेत.
यावर उपाय म्हणून एक मातीची पणती घ्या त्यामध्ये कापूर, पिवळी मोहरी, लाल मिर्ची, जाडं मीठ घालून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. हे केल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसात फरक जाणवेल.
तुमच्या घरात होणारी भांडण बंद होतील. हा धूर तुम्ही रोजच्या रोज करा, रोज शक्य नसेल तर दर शनिवारी हा उपाय करा आणि घरातील कानाकोपऱ्यातुन हा धूर फिरवा.
हा उपाय केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हीटी संपूर्ण निघून जाईल. पिवळ्या मोहरी मध्ये नजर काढण्याची ताकद असते, मिठामध्ये नकारात्मकता काढून घेण्याची ताकद असते. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी नजरदोष काढण्यासाठी अचूक आहेत. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.