तुमचा विश्वास बसणार नाही , पण या ३ कारणांमुळे घरात गरिबी येते..

0
733

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये गरीबी, दरिद्रता येते त्यामागे कारण म्हणजे आपल्याच काही चुका असतात. होय मित्रांनो भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात कि घरामध्ये दारिद्र्य येण्याला आमंत्रण आपण स्वतःच देतो.

ते कशाप्रकारे देतो आणि या दरिद्रते मागे कारण काय आहे? जे आपल्या घराला त्रासदायक ठरते. याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

जर तुम्ही तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू इच्छिता आणि जर तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे खरे भक्त असाल तर भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी आपली मनोकामना सांगून ती पूर्ण व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.

भगवान श्रीकृष्ण नक्कीच तुम्हाला गरिबीमुक्त जीवन बहाल करतील. हिंदू धर्म शास्त्र आणि आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति द्वारे आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की, मनुष्य स्वतःच आपल्या गरिबीला जबाबदार असतो. ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

आपण आपली जीवनशैली ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्या अनुसरून जगत नसतो. त्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या घरातील स्त्री आपल्या स्वयंपाक घराची विशेष स्वच्छता ठेवत नाही आणि मासिक पाळीमध्येही स्वयंपाक घरात येणे-जाणे करते, ती स्त्री घराला दरिद्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

स्वयंपाक घर हे आपल्या घरातील पवित्रतेचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरात असलेले मंदिर , देव्हारा पवित्र आहे त्याचप्रमाणे आपले पोट भरणारे स्वयंपाक घर देखील अत्यंत पवित्र आहे.

शास्त्रात सांगितल्या नुसार, मासिक धर्मा मध्ये स्त्रियांनी स्वयंपाक घरात जाऊन जेवण बनवू नये. अन्यथा निश्चितच दरिद्रतेचा सामना करावा लागतो. सोबतच भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या स्त्रिया चपात्या बनवताना चपाती जाळतात, जाणून बुजून किंवा चुकूनही जळत असतील.

स्वयंपाक घरामध्ये चपातीचे जळणे म्हणजे साक्षात देवी अन्नपूर्णेचा अपमान आहे. या अशा घरांमध्ये माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा कधीच वास करत नाहीत.

भगवतगीता आणि कृष्ण वाणी मध्ये भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की, ज्या घरामध्ये स्त्रिया उष्ट्या भांड्याचा ढिगारा करतात त्या घरामध्ये कधीही धन टिकत नाही.

ते घर दरिद्रतेच शिकार बनते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या घरातील स्त्रिया आपल्या घरातील मान मर्यादेच भान ठेवत नाहीत आणि घराची साफसफाई न करता घरामध्ये कचरा पसरवतात , घरात प्रत्येक सामान अस्ताव्यस्त आहे, घरातील पादत्राणे विखुरलेली आहेत, पलंग नीट आवरलेलं नाही अशा अस्ताव्यस्त घरामध्ये देखील माता लक्ष्मी येत नाही.

चाणक्यनीती नुसार ज्या घरामध्ये देव्हाऱ्याची साफ सफाईचे ध्यान ठेवले जात नाही, घरातले मंदिर धूळ मातीने भरलेले असते, दिवाबत्ती नियमितपणे होत नाही, त्या घरातले मंदिर कधीच सकारात्मक ऊर्जा पसरवत नाही.

अशा घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता कायम वास्तव्य करतात. जर तुम्हाला देखील तुमच्या घरातील दरिद्रता समाप्त करायची असेल तर तुम्ही वर सांगितलेल्या गोष्टींचे अवश्य पालन केले पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here