घरात मासे पाळत असाल तर हि माहिती एकवेळ अवश्य बघा…

0
1648

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आजकाल मासे घरात पाळणे हि एक फॅशन झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. पण तुम्ही मासे पाळण्याचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आज या विषयी जाणून घेऊया.

घरात मासे पाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून मासे घरात पाळल्यानंतर काय काय फायदे होतात याविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.

तुमच्या घरात किंवा ऑफिस मध्ये फिशटॅंक असेल तर नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही. मासे नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखतात. त्यामुळे घरात मासे नक्की पाळले पाहिजेत.

कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसेल तर अशा वेळी तुम्ही मासे पाळले पाहिजेत. मासे पाळणे म्हणजे यशाची निशाणी. वास्तुशास्त्रानुसार एक जोडी गोल्ड फिश ठेवल्याने पती पत्नी मध्ये येणारा दुरावा खूप लवकर कमी होतो.

जर तुमच्या घरामध्ये मासे असतील तर बाहेरून येणाऱ्या लोकांच्या वाईट नजरेपासून तुमचे आणि तुमच्या घराचे संरक्षण होते म्हणून घरात मासे नक्की ठेवा.

जर तुम्ही पाळलेला मासा मेला तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरातील खूप मोठी समस्या नाहीशी झाली आहे. अस म्हणतात की मासे येणाऱ्या समस्या स्वतःवर घेतात आणि तुमच्या वरचे संकट टळते. म्हणून मासे जरूर पाळा.

सकाळी उठल्यावर माशाचे दर्शन नक्की करा अस केल्याने व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो आणि सर्व काम शुभ होतात. ज्या घरात मासे पाळले जातात त्या घरात सदैव देवी लक्ष्मीचा वास होतो.

मासा हा विष्णूचा अवतार आहे आणि माता लक्ष्मी अशा घरांवर खूप प्रसन्न असते जिथे मासा पाळला जातो. मासे पाळणारा व्यक्ती कधी गरीब राहत नाही. घरात फिशटँक ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेत वाढ होते यामुळे घरात सुख समृद्धी ही येते.

फिशटँक मध्ये पाण्याच्या स्वरूपात जलतत्व, लाईटच्या स्वरूपात अग्नी तत्व आणि वायू च्या स्वरूपात वायू तत्व अस्तित्वात असतात. त्यामुळे तुम्ही फिशटँक नक्की ठेवले पाहिजे.

कोणाला मानसिक तणाव असेल तर फिशटँक जवळ येऊन थोडा वेळ बसा आणि माशांना बघा तुमचा तणाव निघून जाईल. फिशटँक ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे घराची दक्षिण पूर्व दिशा.

हि दिशा फिशटँक साठी अत्यंत शुभ मानली जाते, यामुळे घरात धन आणि समृद्धी वाढून संपन्नता येते. म्हणून फिश टॅंक या दिशेला ठेवणे खूपच लाभकारी मानले जाते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here