या दोन राशींचे लग्न म्हणजे रोज भांडण

0
50599

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तीच्या कुंडली जोतिषाना दाखवल्या जातात. जन्म कुंडली मध्ये ज्योतिषी ग्रह , नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते.

पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी वधू वरांच्या राशींचे गुण कसे आहेत हे सुद्धा पाहायला पाहिजेत. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास हि तुमच्या स्वभावातले गुणदोष दाखवत असते.

मग अशावेळी दोन विरुद्ध स्वभावाच्या राशीच्या व्यक्तींचे लग्न झालं तर काय होईल हेच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांची लग्न झाली तर त्यांच्यात वादविवाद होऊ शकतात.

कर्क आणि सिंह रास

ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही. कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत , त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कुंभ आणि मकर रास

कुंभ आणि मकर या दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्या दरम्यान संघर्षाचे कारण बनु शकतो.

वृषभ आणि तूळ रास

या दोन्हीं राशींचे लोक अतिशय बुद्धिमान आणि मोकळ्या मनाचे असतात. सुरवातीच्या काळात यांच्यात खूप चांगलं पटत परंतु दोघांचाही आग्रही स्वभाव. यामुळे हळूहळू ते दोघे एकमेकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आग्रह करू लागतात ,आणि यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते . मित्रानो एकदा का नात्यांमध्ये अहंकार आला तर ते नात कमकुवत होण्याची शक्यता असते.

कर्क आणि धनु रास

कर्क व धनु राशीची व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही . कारण धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगल माहिती असतं. तर कर्क राशीच्या व्यक्तीवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं. त्यामुळे या जोडीच्या जीवनात अनेकदा भांडण आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते.

मिथुन आणि कन्या रास

मिथुन आणि कन्या राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यवहारिक असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. त्यामुळे दोघांचीही मते एकमेकांशी जुळत नाहीत . त्यांच्यात मतभेद उद्भवतात.

खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर कन्या रास सहजपणे पुढे जाते. पण मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.

तर मित्रानो या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांची लग्न झाली तर घरात वाद होऊ शकतात. त्यामुळे ज्यांचे लग्न व्हायचे आहे आणि ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे ते लग्न करण्याआधी जोडीदाराच्या राशीचा विचार करू शकतात.

पण आता ज्यांचं लग्न झाल आहे आणि मग लक्षात आलं आहे कि अरे आपल्या राशींचे स्वभाव तर विरुद्ध आहेत. मग काय करायचं ? मित्रानो बाकी काहीही असलं तरी नवरा-बायकोचं नातं टिकवण्यासाठी गरज असते ती म्हणजे एकमेकांवरचा विश्‍वास आणि प्रेम.

त्यामुळे तुमच्या नात्यात जर प्रेम आणि विश्वास असेल तर मग समजूतदारपणे तुम्ही कुठल्याही समस्येवर तोडगा काढू शकता आणि तुमच्या नात्याची वीण घट्ट करू शकता.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here