अशा असतात कुंभ राशीच्या स्त्रिया… जाणून घ्या सविस्तर माहिती.

0
2602

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज आपण कुंभ राशीच्या स्त्रियांचे पूर्ण वर्णन जाणून घेणार आहोत म्हणजेच कुंभ राशीच्या स्त्रियांचे राहणीमान, वागणं, बोलणं, कुटुंबातील वावर, पती पत्नीच्या संबंधांमध्ये यांच्या अपेक्षा काय असतात, करियर बाबतीत दृष्टिकोन कसा असतो, आरोग्यविषयी कोणत्या समस्या या स्त्रियांना होऊ शकतात या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

कुंभ ही पुरुष रास आहे आणि या राशीचा स्वामी हा शनी आहे. या राशीचे तत्व हे वायू तत्व आहे आणि स्थिर प्रकारची ही रास आहे. या राशीच्या स्त्रियांचे राहणीमान हे अतिशय सोबर असतं.

या राशीच्या स्त्रिया दिसायला मुळातच सुंदर असतात पण या स्त्रियांना ट्रेंडिंग फॅशन करायला आवडत नाही. अगदी साधं, सोबर, सिंपल राहणीमान या राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतं.

स्वतःच्या लिमिट मध्ये वागणारी ही रास आहे. या स्त्रियांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात. म्हणजेच आपण कशा प्रकारे रहायला पाहिजे, स्वतःला कशा प्रकारे कॅरी केलं पाहिजे, समोरच्याशी कशा प्रकारे बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात.

शिवाय भावने मध्ये वाहून जाणं वगैरे या राशीत अजिबात दिसून येत नाही. भावनांचा कोरडेपणा प्रथम दर्शनी तुम्हाला दिसून येईल. या स्त्रियांचे बोलणे देखील अतिशय लिमिटेड असतं.

यांचं बोलणं हे मुद्याला धरून असत त्यामुळे कायद्यात बोलल्यासारखं ही तुम्हाला वाटेल. कधी कधी यांचे बोलणे तुम्हाला धारदार ही वाटू शकते. तर ही गोष्ट कुंभ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते.

सर्वात महत्वाचे म्हणजे बौद्धिक स्थर या स्त्रियांचा चांगला असतो. आणि ज्या स्त्रिया बौद्धिक दृष्ट्या चांगल्या असतात त्यांचे लॉजिकल थिंकिंग (तर्कनिष्ठ विचारशक्ती) ही चांगली असते.

पूर्वी पासून ज्या परंपरा रूढी चालत आलेल्या असतात त्यांच्यावर या स्त्रियांचा विश्वास अजिबात नसतो. कोणतीही रूढी परंपरा असेल त्याचा जोपर्यंत यांना अनुभव येत नाही तोपर्यंत या राशीच्या स्त्रिया त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण. याला कारण म्हणजे बुद्धिवादी ही रास आहे आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही.

या स्त्रियाचे राहणीमान जरी सोबर असले तरी बुद्धिमान असल्यामुळे यांचे विचार खूप पुढचे असतात. समाजापुढे दोन पावले जाऊन विचार करणे या राशीमध्ये दिसून येते. त्यामुळे तुम्ही जर कुंभ राशीच्या स्त्रियांना भेटला तर तुम्हाला त्यांचे विचार पटणार नाहीत.

या राशीच्या स्त्रिया प्रचंड शिस्तबद्ध असतात. त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्तबद्धपणा तुम्हाला दिसून येईल. घरामध्ये सगळ्या वस्तु जिकडच्या तिकडे दिसायला हव्यात सोबतच यांच्या बोलण्यात-वागण्यात ही शिस्त बद्ध पणा दिसून येतो.

कोणतीही गोष्ट समजून घेऊन व्यवस्थित रित्या पार पाडतात म्हणून या स्त्रिया नोकरी अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर कधीही प्रश्न चिन्ह उठत नाही.

या राशीच्या स्त्रियांकडून चूक झाली तर ती सहजपणे मान्य करतात व ही चूक परत होऊ नये म्हणून दिलगिरी सुद्धा व्यक्त करतात. एकत्र कुटुंबामध्ये ऍडजस्टमेंट यांना जमत नाही. एकत्र कुटुंबामध्ये भावनाच्या ठिकाणी या फिट होत नाहीत.

कुठलीही गोष्ट जशी आहे तशीच व्हायला पाहिजे हा यांचा नियम असतो. यांनी एक चौकट आखलेली असते आणि त्याबाहेर जर कोणी गेले म्हणजे लिमिट च्या बाहेर जर वागले तर या स्त्रिया कठोर होऊ शकतात. म्हणून यांना एकत्र कुटुंबात जमत नाही.

या स्त्रिया रुसल्या की लगेच त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नका. थोड्या वेळाने जा आणि मग बोला. तेव्हा या स्त्रिया कुठे कधी काय चुकलं हे तुम्हाला सांगतील आणि परत ही चुक होणार नाही म्हणून कमिटमेंट मागतील आणि तुम्ही ते एक्सेप्ट केलं तरच तुमचे पॅच अप होऊ म्हणजेच भांडण मिटू शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here