नमस्कार मित्रानो,
मित्रानो 10 जुलै 2022 रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. मित्रानो वर्षभरात ज्या काही एकादशी येतात त्या सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. कारण याच दिवसापासून श्री विष्णू हे योग निद्रेत जातात.
या दिवसापासूनच चातुर्मासाचा देखील प्रारंभ होतो. या दिवसापासून 4 महिन्यांपर्यंत श्री विष्णू हे योग निद्रेत असतात आणि देवउठनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. मित्रानो या आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला चालत वारी करतात.
एकादशीच्या दिवशी श्री विष्णूच्या विठ्ठल रूपाचं दर्शन घेतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात. मित्रानो या दिवशी नदी मध्ये स्नान करणे देखील खूप पुण्याचं काम समजलं जात. या दिवशी जर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केले तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते.
नदीत स्नान केल्याने आपल्याला जे पुण्य मिळणार आहे तेच पुण्य आपण घरच्या घरी कस मिळवू शकतो यासाठी काही उपाय आहेत ते आपण आज जाणून घेऊया.
मित्रानो आंघोळीच्या पाण्यात हि एक वस्तू टाका ज्यामुळे तुम्हाला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. मित्रानो आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की काय टाकायचं आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणती आहे ती वस्तू.
मित्रानो या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. मित्रानो पूजा साहित्याच्या कोणत्याही दुकानांमध्ये तुम्हाला हे गंगाजल सहज मिळेल. तर या गंगाजलाचेच काही थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे.
मित्रानो आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक म्हणजे ” गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु ” तर मित्रानो या नद्यांच्या नावाचं आपल्याला आंघोळ करताना उच्चारण करायचं आहे.
यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल.या आषाढी एकादशीला चंद्र भागेच्या स्नानाचा पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुम्हा सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रानो कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल अवश्य लिहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.