सुर्य मावळताना उंबऱ्यावर जाळा ही वस्तू…शत्रू बरबाद होईल…

0
64

नमस्कार मित्रांनो

जीवन जगत असताना आपला सामना अनेक लोकांशी होत असतो काही लोक चांगले असतात तर काही वाईट असतात. असे वाईट प्रवृत्तीचे लोक चांगल्या लोकांना त्रास देतात आणि हा त्रास कधीकधी इतका वाढतो की हा त्रास सहन करणं अगदी अशक्य बनत.

कधीकधी तर जीव सुद्धा नकोसा होतो आणि अडचण अशी असते की हे त्रास देणारे लोक त्यांच्या पैशांच्या, सत्तेच्या किंवा पदाच्या जोरावर लोकांवरती अन्याय करत असतात. अशा वाईट लोकांशी आपण सरळ सरळ दोन हात करू शकत नाही.

त्यांची राजकीय पोहोच किंवा पब्लिक पावर, पैसा संपत्ती त्यांच्याकडे भरपूर असते अशा वेळी या लोकांशी लढण्यासाठी तंत्र शास्त्रामध्ये काही प्रयोग सांगितलेले आहेत. ज्या व्यक्ती आपल्यासाठी त्रासदायक असतात त्या व्यक्तींना शत्रू असं संबोधलेल आहे.

तर या शत्रूंना शांत करण्यासाठी किंवा या शत्रूंना बरबाद करण्यासाठी काही टोटके करता येतात. आज आपण तीन असे टोटके पाहणार आहोत की जे शत्रूला अक्षरशः बरबाद करतात. बरबाद या अर्थाने की ती व्यक्ती ज्या गोष्टीच्या बळावर तुम्हाला त्रास देत आहे त्या गोष्टी तिच्याकडून हिरावल्या जातात.

जर समोरचा व्यक्ती खूप बलवान आहे, त्याच्याकडे भरपूर ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर तो तुमच्यावरती अन्याय करत आहे तर त्याची ताकद त्याच्यापासून हिरावली जाते, तो दुर्बल बनतो. तो आजारी पडेल, शारीरिक मानसिक दृष्ट्या त्याच खच्चीकरण होईल.

ती व्यक्ती पैशांच्या जोरावर हे सगळं काही करत आहे तर लक्ष्मी त्याच्यापासून निघून जाते पैसा त्याच्यापासून निघून जातो आणि तो दरिद्री बनतो. जर तो सत्तेच्या जोरावर हे सगळं काही करत आहे तर त्याची ती सत्ता त्याचे ते पद निघून जाते किंवा त्याच्या वर ज्या व्यक्तींचा वरदहस्त असतो अशा व्यक्तींचं वाटोळं करण्याची ताकद या टोटक्यांमध्ये असते.

मित्रांनो हे टोटके करताना विनंती आहे की आपण कोणत्याही निष्पाप व्यक्तीला बरबाद करण्यासाठी याचा वापर करू नका अन्यथा हे टोटके जर उलटले तर त्यांचा तुम्हालाच अतिशय त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्या. गोरगरिबांच्या पाठीशी, निष्पाप लोकांच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वर उभा असतो आणि परमेश्वराच्या समोर हे टोटके कधी चालत नाहीत. जाणून घेऊया हे टोटके कसे करावेत.

1) हा टोटका आपण सायंकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर करायचां आहे. संपूर्ण रात्र भरात तुम्ही कधीही हा टोटका करू शकता. यासाठी एका सफेद रंगाच्या कागदावर पांढर्‍या कागदावर आपण काळ्या शाईने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. यासाठी तुम्ही काजळ सुद्धा वापरू शकता. एक तर काळ्या शाईचा स्केचपेन घ्या किंवा काजळ घ्या आणि तुमच्या शत्रूचं नाव लिहा हे शत्रूच नाव लिहिल्यानंतर या कागदाची आपण घडी घालायची आहे आणि हा कागद आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे.

उंबर्यावर हा कागद ठेवल्यानंतर तुम्ही पायामध्ये जी चप्पल घालता किंवा जे बूट घालता त्याने या कागदावरती जोर जोराने सात वेळा वार करायचे आहेत. थोडक्यात सात वेळा चप्पल त्यावरती जोरजोरात मारायची आहे किंवा बूट मारायचे आहे. लक्षात घ्या ही चप्पल किंवा बूट मारताना पूर्ण त्वेषाने तुमचा संपूर्ण राग त्याठिकाणी निघायला हवा हे लक्षात ठेवा तुम्ही ही जी कृती करत आहात यातून तुमचा शत्रू बरबाद होणार आहे तो गुडघे टेकणार आहे याची खात्री बाळगा.

अशाप्रकारे हि चप्पल किंवा बूट मारल्यानंतर हा कागद आपण एखाद्या पात्रामध्ये जाळायचा आहे आणि त्याची जी राख असेल ती एखाद्या गटारात किंवा टॉयलेटमध्ये ही राख टाकून द्यायची आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हा टोटका केल्यानंतर तुमच्या शत्रूची बरबादी सुरू होते.

2) तुम्ही ज्या ठिकाणी चपला सोडता शक्यतो चपला या घराच्या बाहेर एका बाजूला असाव्यात, उंबरठा समोर चपला सोडण चुकीच आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही चपला किंवा बूट सोडता त्याच्या बरोबर खाली तुमच्या शत्रूचं नाव कोळशाने लिहा.

हीसुद्धा क्रिया सूर्यास्तानंतर सायंकाळी उशिरा करायची आहे. येता-जाता तुमचा पाय त्या शत्रूच्या नावावरती पडायला हवा किंवा त्यावर ती चपला-बूट आपण सोडायला हवी. लक्षात घ्या या ज्या चपला असतात किंवा बूट असतात आपण अनेक ठिकाणी फिरत असतो आणि अनेक ठिकाणची निगेटिव्ह एनर्जी नकरात्मक उर्जा चपलांसोबत आपल्याकडे येत असते/

जेव्हा या शत्रूच्या नावावरती ही संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आपण ठेवतो एक प्रकारचा दाब टाकतो तेव्हा त्या शत्रूला एक सूक्ष्मतम अस जग आहे आणि या सूक्ष्मतम जगाच्या माध्यमातून त्या शत्रू वरती प्रेशर टाकण्याचं काम हे टोटके करत असतात.

मित्रांनो सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला तुमच्या शत्रूवर काहीही परिणाम झालेला दिसणार नाही मात्र हे उपाय करण सोडू नका. पहिला उपाय एकदाच करायचा आहे मात्र जो चपलांचा उपाय सांगितला त्यावर चपला सोडायचा हे नाव पुसल की पुन्हा एकदा तिथे नाव लिहीत चला.

3) आपले जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या उंबरठ्यावर कोळशाने किंवा काजळाने तुमच्या शत्रूचं नाव तुम्ही लिहायच आहे आणि टॉयलेटमध्ये येता जाता त्या नावावरती जोरजोरात पाय आपटायचा आहे.

घरातल्या सर्वांना करायला काही हरकत नाही. तुम्ही स्वतः केलं तरी चालेल. शत्रुची शक्ती क्षीण होऊ लागते. मित्रांनो हे उपाय अर्थातच गुप्त असतात आणि ते जोपर्यंत गुप्त आहेत तोपर्यंतच त्यांचा इफेक्ट चालू राहतो. कुठेही या बद्दल वाच्यता करण्याची चूक अजिबात करू नका.

तुमचा शत्रू हात जोडून माफी मागेल किंवा तुमचा शत्रू शत्रुता सोडून तुमच्या जवळ येईल व तुमच्याशी मैत्री भावाने वागू लागेल आणि अशावेळी जर तो मैत्रीचा हात पुढे करतो आहे तर तो हात स्वीकारा. मित्रांनो शत्रुत्व हे काही दिवसांपुरतच असाव हे शत्रुत्व कायमस्वरूपी ठेवू नका.

आपल्या जीवनामध्ये आपण मित्र जोडा आणि शत्रूंची संख्या कमी करत चला. आपण राजकारणामध्ये बेरजेचे राजकारण ऐकले असेल सातत्याने चांगल्या लोकांची संगत करा वाईट लोक जर चांगल्या भावनेने वागत असतील तर त्यांचा आपण स्वीकार करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here