नमस्कार मित्रानो
मित्रानो आपण भावनेच्या भरात , अति दुखी , अति आनंदी असतो तेव्हा अशा परिस्थितीत आपण आपल्या बऱ्याच गोष्टी नकळत अनेक व्यक्तींशी शेअर करून बसतो. ज्या व्यक्ती आपल्याला पुढे जाऊन दुखावतात आणि त्याचा गैरफायदा घेतात.
असे अनुभव आलेले शंभरातले 70 लोक तर या जगात नक्की असतील की ज्यांनी कुणासमोर मन मोकळं केले आणि समोरच्या व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेतला. अशा अनेक लहान लहान गोष्टी आहेत.
ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गोष्टी शक्य होईल तेवढ्या गुप्त ठेवा , म्हणजे तुम्हाला श्रीमंत होण्यापासून किंवा तुमची प्रगती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे , तुमच्याकडे किती सोने-नाणे आहे याची वाच्यता कुठेही करू नका. तुम्ही पाहिले असेल कि काही बायकांना सवय असते शेजारीपाजारी सांगण्याची कि माझ्याकडे किती सोनं नाण आहे.
घरातील बायका नकळत सगळ्यांना सांगतात. अशा गोष्टी बाहेर सांगणे अत्यंत चुकीचे आहे. आपण आपलं धन , धान्य हे नेहमी गुपित ठेवायला हवं कारण लक्ष्मीला तिचा बाजार मांडणे अजिबात आवडत नाही.
दुसरी गोष्ट अशी की महिलांनी आपले वय कोणालही सांगू नये. यामागे बरीच कारणं आहेत. तुम्हाला इंटरव्यूला जायचं असेल , तुम्हाला कोणत्या परीक्षा द्यायच्या असतील अशी अनेक छोटी-छोटी कारण आहेत. तुमचे रूप तुमच्या सौंदर्यासाठीच नाही तर इतर गोष्टींशी निगडीत आहे.
जेव्हा तुमच्या प्रगतीचे दिवस असतात आणि तुम्हाला एखादी संधी आली आणि तुमचे वय त्याच्या आड येत असेल तर तुम्हाला समाज बोलू शकतो आणि तुम्हाला दुःखी करू शकतो.
बाकी आपले कागदपत्र तर कोणी बदलू शकत नाही. पण ज्या बायकांना आणि स्त्रियांना किंवा पुरुषांना हे ऐकून दुःखी होण्याची सवय असते की कुणी बोललं की झालं दुखी की त्या व्यक्तींनी तर या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
तिसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील कमतरता. कमतरता म्हणजे काय तुमच्या घरात कोणीही आजारी असेल , तुमच्या घरात एखादी व्यक्ती खोटारडी असेल , रागीट असेल किंवा अतिउत्साही असेल.
इथे सांगायचा मुद्दा हा आहे कि घरातील कुठल्याही कुरबुरी घरातून बाहेर जाता कामा नये. विशेष करून घरातील वाद चार भिंतीतच राहावेत. घरातून बाहेर जाता कामा नये.
पुढची गोष्ट आहे ती म्हणजे औषधे. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची औषधे चालू असतील तर त्याचाही दिंडोरा पिटू नका. दिंडोरा पिटणे म्हणजे काय जर तुम्हाला शुगर असेल किंवा जर तुम्हाला मेंदूच्या कुठल्या संदर्भात गोळ्या चालू असतील तर ते जाहीर करु नका.
त्यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेतात. प्रॉपर्टीमध्ये एखाद्याला जर मानसिक रोगी जाहीर केलं तर त्याला वेगळ केल जात. एखाद्या नाजूक विषयावर तुम्हाला औषध सुरु असेल तर तुम्ही कोणाशी शेअर करू नका. अन्यथा तुम्हाला एखादा मोठा आजार असेल तरी तो फक्त डॉक्टरांशी आणि घरातल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीशी डिस्कस करा.
ह्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अपमान. जर तुमचा बाहेर कोणाकडून अपमान झाला असेल, किंवा तुमचा जर शेजाऱ्यांकडून अपमान झाला असेल, किंवा एखाद्या स्त्रीचा कोणत्या पुरुषाकडून किंवा पुरुषाचा एका स्त्रीकडून अपमान झाला असेल. असा झालेला आपला अपमान एक तर सोडून द्यावा लागतो किंवा ज्यांनी आपला अपमान केलाय अशा लोकांना तोंड द्यावं लागत.
जर तुमचा अपमान झाला असेल, तर तुम्हाला त्या अपमनाच उत्तर द्यायला शिकायला हवं. अन्यथा तो अपमान पचवता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टींमुळे काय होईल, तर तो अपमान समाजात पसरणार नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.