नमस्कार मित्रांनो,
मित्रानो तुम्ही लग्नाचा विचार करताय का? तुमच्या पैकी कोणी स्थळ बघायला सुरुवात करतय का? मग ही माहिती तुम्ही नक्की वाचा. आपल्याकडे लग्न जमवताना वधू वरांचे किती गुण जुळत आहेत हे बघितलं जातं, त्याचप्रमाणे त्यांच्या राशीचे स्वभाव ही जुळतात की नाही हे ही बघितलं जातं.
राशीच्या अश्या काही जोड्या आहेत ज्यांनी एकमेकांशी विवाह करणे टाळलेलंच बरं. मग नक्की कोणत्या दोन राशींनी एकमेकांशी लग्न करावे किंवा करू नये.
आक्रमक आणि बेधडक स्वभाव असणाऱ्या राशींनी समान गुण असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये नाहीतर त्या दोघांमध्ये कायमच संघर्ष सुरू असतो.
तसेच दोन्ही सौम्य राशींनी ही लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघेही गडबडून जातात. दोघांपैकी एकजण बिनधास्त, धाडसी आणि दुसरा सौम्य असा असला पाहिजे म्हणजे मग दोघांचं चांगलं जमत. अस म्हणतात ना संसारात एकाने आग व्हावे तर दुसर्याने पाणी व्हावे तेच तत्व इथे आहे.
मेष रास – याच तत्वानुसार मेष राशीच्या आक्रमक व्यक्तींनी कर्क रास, तूळ रास आणि मिन रास अशा अध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशीच्या व्यक्ती बऱ्याच सौम्य असल्याने त्यांना मेष राशीसारखा खमका जोडीदार मिळाल्यास तुमच्या प्रपंचाची नौका कोसळत नाही. मेष राशीच्या व्यक्तींनी कन्या राशीच्या व्यक्तींशी लग्न करू नये.
वृषभ रास – ही काहीशी बेधडक आणि स्वभावाने अतिशय रसिक राशी आहे. जीवनातील अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला त्यांना आवडते. नवीन ठिकाणी प्रवास करणे, कला, शृंगार इत्यादी त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असतात.
त्यांचा सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या अधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. वृषभ राशीच्या व्यक्तींनी मकर आणि सिंह व धनु राशीसोबत विवाह टाळावा.
मिथुन रास – ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने त्यांच्या आरेला कारे उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडण होतील. हेच टाळण्यासाठी त्यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजेच कर्क, तूळ, मिन या राशीचा जोडीदार निवडावा. या राशीच्या व्यक्तींनी वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी लग्न करू नये.
कर्क रास – हे अतिशय भोळे आणि सरळ मार्गाचे व्यक्ती असतात. याना मेष, धनु, सिंह, वृश्चिक यासारख्या राशीचा जोडीदार हवा. कुंभ राशीच्या व्यक्तीसोबत यांनी विवाह करू नये.
सिंह रास – हे सरळ मार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, फसवणूक यांना अजिबात पटत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तीसोबत विवाह करणे टाळावे.
कन्या रास – ही गरीब स्वभावाची रास आहे पण संशयी स्वभाव हे या राशीचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच यांनी कर्क, मीन, तूळ इत्यादी राशींसोबत लग्न करणे टाळावे.
तूळ रास – ही रास बरीचशी वृषभ राशीप्रमाणे असते फक्त वृषभ राशी इतकी बेधडक नसते. यांनी मीन राशीसोबत विवाह करणे टाळावे.
वृश्चिक रास – आक्रमक, सूड उगवणारी ही रास आहे, ही अतिशय दीर्घ उद्योगी आहे. यांनी मेष, सिंह, मकर , मिथुन या राशीच्या व्यक्तींसोबत विवाह करणे टाळावे.
धनु रास – ही आक्रमक आणि स्वभावात समतोल राखणारी रास आहे. यांनी मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीसोबत लग्न करणे टाळावे.
मकर रास – या राशीचे लोक खुप कष्टाळू असतात, यांच्याकडे भावनेला फार महत्व नसते. काहीसे अरसिक, कर्तव्य कठोर अशी या राशीत माणसे आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह, कुंभ या राशीच्या व्यक्तींशी लग्न करणे टाळावे.
कुंभ रास – ही बुद्धिमान रास आहे. हे लोक भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. तस तर कुंभ राशीचे लोक कोणाशीही लग्न केले तरी स्वतःचेच वर्चस्व गाजवण्याची प्रयत्न करतात पण मेष, वृश्चिक, कुंभ, सिंह याच राशिशी लग्न करणे टाळावे.
मीन रास – ही राशी चक्रातील अतिशय साधी भोळी रास आहे. अतिशय सौम्य, देवभोळ्या, अध्यात्मिक लोकांची ही रास आहे. यांच्यात अजिबात आक्रमकता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. याना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी कर्क आणि मीन राशीच्या लोकांशी लग्न टाळावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.