मुलांच्या डोक्यात भवरा असणे काय आहे याचा अर्थ ? कसे असते यांचे भविष्य ?

0
752

नमस्कार मित्रांनो,

बहुतेक व्यक्तींच्या डोक्यावर वर्तुळाकार असे चक्र बनलेले असते , त्याला आपण भवरा म्हणतो. काही मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने तर काही मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने भवरा असतो. काही मुलांच्या डोक्यावर दोन किंवा तीनही भवरे असतात.

मुलांच्या डोक्यावरील हे भवरे पाहुन पूर्वीच्या काळी आई , आजी विविध निष्कर्ष काढत असत. हा मुलगा असा असेल, हा मुलगा तसा असेल , हेच नाही तर त्या मुलाच्या पाठीवर आता मुलगा होईल की, मुलगी हे सुद्धा त्यांना समजत असे. हे कसे काय समजत असावे? हे खरे असते का?

याचे काही शास्त्र नियम आहेत का? चला तर जाणून घेऊयात मुलांच्या डोक्यावरील असलेल्या भवऱ्यांचे शास्त्र. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात घड्याळाच्या दिशेने असलेल्या भवऱ्याबद्दल.

ज्या मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने वर्तुळाकार भवरा म्हणजे चक्र असते अशी मुले शांतता प्रिय असतात. ते सर्वांशी मिळून मिसळून व समजुतीने वागतात. इतरांची काळजी घेतात. ही मुले जास्त करून आईच्या बाजूने झुकलेली असतात.

ही मुले आईची बाजू जास्त घेतात. आईवर यांचे खूप प्रेम असते. ही मुले खूप हुशार असतात. त्यांची बुद्धी खूप तीव्र असते. अभ्यासातही यांचे मन खूप एकाग्र होते. यांना स्वच्छता व टापटीप , नीटनेटकेपणा खूप आवडतो. अशी मुले भविष्यात खूप प्रगती करतात. उत्तरोत्तर ते यशाची शिखरे गाठतात.

ज्या दाम्पत्यांना घड्याळाच्या दिशेने भवरा असलेली मुले असतात त्यांना शक्यतो दुसरे बाळ हे मुलगी होते. यात काहीही शास्त्रीय आधार नाही परंतु काही तर्क असतात. पूर्वीपासून चालत आलेली असतात आणि ते खरेही असतात.

यात काही अपवाद असूही शकतात परंतु शक्यतो अशा मुलांच्या पाठीवर दुसरी मुलगी होते. असे बहुतेक वेळा पाहण्यात आलेले आहे. आता जाणून घेऊयात ज्या मुलांच्या डोक्यावर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने भवरा असतो अशा मुलांबद्दल.

ज्या मुलांच्या डोक्यात घडाळ्याच्या विरुद्ध दिशेला भवरा असतो अशी मुले ही शांत व समजूतदार असतात. अशी मुले आई व वडील दोघांवरही सारखेच प्रेम करतात आणि दोघांची बाजू घेतात. ही मुले खूप प्रेमळ असतात तसेच खूप हुशारही असतात.

यांनी एकदा जर एखादी गोष्ट ठरवली तर जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करणे सोडत नाहीत. त्या गोष्टीचा पिच्छा पुरवून ती मिळवतातच. ते स्वतःच्या कष्टाच्या जोरावर खूप प्रगती करतात.

त्याबरोबरच अशा मुलांच्या पाठीवर शक्यतो मुलगा होतो. म्हणजे यांना लहान भाऊ होतो असे बहुतेक वेळा दिसून येते. काही मुलांच्या डोक्यावर दोन भवरे असतात. आता जाणून घेऊयात त्या मुलांबद्दल.

ज्या मुलांच्या डोक्यावर दोन भवरे असतात अशी मुले खूप हट्टी आणि खोडकर असतात. त्यांना काही न काही आदळ आपट करण्याची सवय असते. असे म्हणतात ज्यांच्या डोक्यावर दोन भवरे असतात त्यांच्या पायातही भवरा असतो की काय? ते भवऱ्यासारखे सतत पळतच राहतात.

ते एका ठिकाणी शांत बसूच शकत नाहीत. त्यांच्या मनात नेहमी नवनवीन कल्पना जन्म घेत असतात आणि ते त्या कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करताना आई वडिलांची दमछाक करून सोडतात.

ही मुले खूप मस्तीखोर असतात. खूप धांदरट, धीट, बिनधास्त अशी असतात. यांचे नेहमी काही ना काही उद्योग चालूच राहतात. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की मुलांच्या डोक्यावर जे भवरे असतात त्या भवऱ्यांचा काय अर्थ असतो ते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here