तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळता ? उत्तर हो असेल तर हि माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही… एकदा वाचा…

0
29212

नमस्कार मित्रानो

मित्रांनो जगात अशी अनेक माणसे आहेत जी कुत्र्यांवरती खूप प्रेम करतात आणि त्यांना कुटुंबातील एक व्यक्ती प्रमाणेच घरामध्ये पाळतात. तर दुसरीकडे कुत्र्यांचा राग करणारे, भीती वाटणारे त्यांच्यापासून त्रास होतो म्हणून दूर राहणारे अनेक लोक आहेत.

आज आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला माहित नसलेली माहिती घेऊन आलो आहोत. मित्रानो शास्त्र काय सांगते घरात कुत्रा पाळणे चांगले की वाईट? कशाप्रकारे कुत्रा पाळल्यामुळे आपले ग्रह दोष ठीक होतात आणि धना संबंधित समस्या, भूत बाधा, शत्रूपीडा यापासून सुटका करण्यासाठी कुत्रा पाळणे आवश्यक कसे आहे? त्यासंबंधीची विस्तृतपणे माहिती आपण घेऊयात.

बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की, कोणत्या प्रकारचे ? कोणत्या रंगाचे ? कुत्रे कुत्र घरात पाळावे काय उपाय करावेत अथवा कोणत्या दिशेला बांधावे? ग्रह दोष असल्यास कोणत्या प्रकारच्या गोष्टी त्याला खायला द्याव्यात ज्याने आपल्याला लाभ होईल. ही माहिती खूप खास आणि सरळ आहे.

भगवान भोलेनाथ यांचे अवतार भैरवनाथ जे तंत्र मंत्राचे मुख्य देवता मानले जातात यांचे वाहन कुत्रा आहे. जर तुम्ही कोणत्याही भैरवनाथाच्या मंदिरात गेला असाल तर तुम्हाला तिथे काळ्या रंगाचे श्वान अवश्य बघायला मिळाले असेल.

ज्या लोकांना नकारात्मक ऊर्जेने ग्रासले आहे, भूत प्रेत संबंधी त्रास, मानसिक त्रास, भीती वाटणे अशा प्रकारचा त्रास असेल त्या लोकांसाठी कुत्रा पाळणे हे एक वरदान आहे. कुत्रा फक्त भैरवनाथांशीच नाही तर राहू, केतू, शनी यांच्याशी देखील संबंधित आहे.

म्हणजे जर तुमच्या आयुष्यात राहू, केतू आणि शनी या संबंधित ग्रह दोष असेल तर पूढील त्रास होत असतात जसे नोकरी नसणे, कोणतेही काम करू शकत नाही, अनेक अकारण शत्रू बनतात, काल सर्प योग बनतो, विवाह जमण्यास अनेक अडथळे येतात, संतानप्राप्ती मध्ये बाधा येते, मनात बैचेनी.

आत्मविश्वासाच्या अभावाने कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही, कोणतेही काम करता येत नाही , सर्वत्र अपयश पदरी पडते, कुटुंबातील नाते संबंध बिघडू लागतात, मात्र कुत्रा पाळल्याने सर्व दोषांचे निवारण होते.

काळीविद्या, जादू टोना तंत्र मंत्र, भूत प्रेत बाधा हे कुत्र्यांना सर्वात आधी समजते. कुत्रा ह्या शक्ती स्वतःवर घेऊन घरातील मालकावर काहीही येऊ देत नाही. कुत्रा अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणून देखील ओळखला जातो.

काळ्या रंगाचा कुत्रा शनीचे प्रतीक, पांढऱ्या रंगाचा कुत्रा राहूचे प्रतीक तर भुर्या रंगाचा कुत्रा केतूचे प्रतीक मानले जाते. ज्या पद्धतीने तुमचे ग्रह खराब असतील त्या हिशोबाने त्या त्या रंगाचे कुत्रे तुम्ही पाळावे.

मित्रानो तस तर सर्वच कुत्रे येणारी संकटे ओळखू शकतात. जे लोक कुत्र्यांचा राग करतात किंवा ज्यांना कुत्रे आवडत नाहीत ते लोक नेहमी चिंताग्रस्त पाहायला मिळतील.

कुत्र्यांवर प्रेम करणारे लोक बिलकुल निडर असतात, मनाने साफ असतात. अडचणीतून मार्ग कसा काढायचा आहे या लोकांना लवकर समजते. ज्या घरात कुत्रा पाळला जातो त्या घरातील लोकांचे मूलाधार चक्र संतुलित राहते. त्यामुळे त्यांच्या घरात संसारिक सुख कायम नांदते.

चांदीच्या ग्लासात केसर घालून रात्री अर्धा ग्लास दूध पिऊन सकाळी ते अर्ध राहिलेलं दूध आपल्या कुत्र्याला प्यायला द्या. असं केल्याने कोणत्याही नकारात्मक ऊर्जा असल्यास टिकणार नाहीत.

शत्रूभय असल्यास लाडुत लवंग लावून भगवान शंकरांना प्रसाद दाखवून तो लाडू कुत्र्याला द्यावा. असं सलग ११ दिवस केल्याने शत्रू तुमच्या समोर टिकणार नाही. दही साखर मध्ये आपला चेहरा बघून कुत्र्याला खाण्यास द्यावे, तुमच्या धन संबंधित असलेल्या सर्व समस्या संपतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here