दिवाळीत हि कामे चुकून सुद्धा करू नका… गरिबी येईल , बरबाद व्हाल…

0
83

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मातील प्रत्येक सणाचे स्वतःचे महत्त्व आणि नियम आहेत. ते सण नियमानुसार साजरे केले तर देव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. दिवाळीसंदर्भात देखील काही नियमही सांगण्यात आले आहेत.

दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी लोक प्रामाणिक मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने पूजा आणि उपाय करतात.

त्यांच्यावर प्रसन्न होऊन देवी लक्ष्मी भक्तांवर कृपावर्षाव करते. ज्योतिष शास्त्रात दिवाळीबद्दल काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे योग्य पालन केल्यासच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

ज्योतिष शास्त्रानुसार या नियमांचे पालन केले नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि आर्थिक संकटाने व्यक्ती घेरला जातो. मित्रानो यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबर रोजी येत आहे आणि या दिवशी पूजा करताना आणि दिवाळीनंतरही काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असं म्हणतात की दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी चुकूनही झाडूचा वापर करू नका. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. तसेच, व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

स्वयंपाकघरात अन्न शिजवताना शूज आणि चप्पल पायात असू नयेत. स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते आणि स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घातल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.

दिवाळीच्या दिवशी स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नका. तसे, ज्योतिषशास्त्रात ही गोष्ट रोजचीच सांगितली आहे. पण ही गोष्ट नियमितपणे शक्य होत नाही, त्यामुळे दिवाळीच्या रात्री या गोष्टीची विशेष काळजी घ्या. जिथे अस्वछता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करत नाही.

आंघोळीनंतर सूर्यदेवाला नियमित पाणी अर्पण करावे, असे सांगितले जाते. शास्त्रात असे म्हटले आहे की सूर्यदेव ही एकमेव अशी देवता आहे, जी भक्तांना दररोज दर्शन देते. आणि नियमित अर्घ्य दिल्याने जीवन जगण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते.

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पूजा करताना तीन शंख ठेवा. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. यासोबतच लक्षात ठेवा की, प्रजवलीत दिवा फुंकून विझवू नका तसे करण्यास शास्त्रानुसार मनाई आहे.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने आपल्या वाईट सवयी देखील सोडल्या पाहिजेत. झोपताना ओल्या पायांनी झोपू नये. तसेच नखे खाण्याची किंवा चावण्याची सवय सोडून द्या. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here