नमस्कार मित्रानो
मित्रानो सध्या IPL सीजन चालू असून चेन्नई सुपर किंग्स हा संघ टॉप २ मध्ये आहे. २०२१ मधील ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र असे असले तरी या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू म्हणेजच सर्वांचा आवडता दीपक चाहर याची गेल्या दोन दिवसा पासून खूप चर्चा होत आहे.
हि चर्चा त्याच्या खेळाच्या बाबतीत नाही तर त्याच्या खऱ्या आयुष्यातील घडलेल्या एक अविस्मरणीय क्षणाची होत आहे. त्यामागे कारण म्हणजे या सामन्यानंतर दीपकने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालत तिच्याशी साखरपुडा केला.
तो अविस्मरणीय क्षण गुरुवार ७ सप्टेंबर रोजी CSK आणि पंजाब मध्ये झालेल्या सामन्यानंतर दुबईतील स्टेडियम मध्ये घडला. दीपक ने आपल्या रिअल लाईफ लव्ह पार्टनर म्हणजेच आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी घालून लग्नासाठी मागणी घातली.
त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच जया भारद्वाज. ही बिग बॉस मधल्या सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. दीपक चाहर आणि त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज यांचा एकमेकांना अंगठी घालण्याचा विडिओ इंटरनेट आणि सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला ,आणि त्याच्या चाहत्यांनी त्या दोघांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या.
आपण सर्वांनी तो व्हिडियो आणि फोटोज पाहिले असतीलच. पण सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल कि त्याची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण ? जया भारद्वाज ही परदेशातील तरुणी नसून ती भारतातलीच आहे. होय मित्रानो जया दिल्ली मध्ये स्थायिक असून एका कॉर्पोरेट फर्म मध्ये कामाला आहे .
ही माहिती आम्हाला दीपक चाहरची बहीण मालती चाहर हिच्या इन्स्टाग्राम पोस्ट वरून मिळाली आहे . चाहर ने आपल्या गर्लफ्रेंड ची ओळख संपूर्ण सिएसके टीम ला करून दिली.
सूत्रांच्या माहिती नुसार दीपक चाहर आणि जया भारद्वाज लवकरच लग्नाबांधनात अडकणार आहेत. दीपक चाहरचा भाऊ राहुल चाहर आणि त्याच्या मित्रांनी त्या दोघांना इन्स्टाग्राम पोस्ट वरून शुभेच्छा दिल्या आहेत.
बघा व्हिडियो