घरात हा धूर करताच…भूत-प्रेत , वाईट शक्ती कुत्र्यासारखी पळू लागतील….

0
899

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आज आम्ही तुम्हाला एका अद्भुत धुरा विषयी सांगणार आहोत म्हणजेच आपण जे घरात धूप आरती करून जो धूर करतो त्यात फक्त या धुरीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींना नष्ट करू शकता आणि ते ही अगदी मुळासकट.

हे कसे करायचे आहे? कधी करायचे आहे? यासाठी कोणकोणती सामग्री लागेल याची माहिती घेऊया. सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती ज्याला आपण पोजिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणतो, या दोन्हीही ब्रह्मांडातील दोन ऊर्जा असतात.

तुम्ही अस समजू शकता की ही ब्रह्मांडातील ऊर्जेमुळे कोणाचे चांगले होत असेल तर ती सकारात्मक ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा जर कोणाच्या वाईटासाठी कार्य करते तर ती नकारात्मक शक्ती असते.

ती ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक ऊर्जा हे त्या व्यक्तीच्या कार्य प्रणालीवर अवलंबून असते की जिला आपण पोजिटिव्ह एनर्जी बोलू की निगेटिव्ह एनर्जी बोलू शकतो.

तर ती फक्त आणि फक्त ऊर्जा असते. फक्त एवढे लक्षात ठेवा की ही जी ऊर्जा तिला बनवू शकत नाही आणि तिला संपवले देखील जाऊ शकत नाही. तिला फक्त आणि फक्त परिवर्तित केले जाऊ शकते.

मग अशाच प्रकारे होते काय की जेव्हा आपल्या जीवनात कोणतीही उर्जा, एक शक्ती कार्य करत असते आपल्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी, आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाण्यासाठी तर त्याच उर्जेला पोजिटिव्ह ऊर्जा म्हणतात.

याच उलट जेव्हा कोणती ऊर्जा आपल्या जीवनाला विध्वंसक आणि बरबाद करत असते, आपल्याला नुकसानीत घालत असते तर त्याच उर्जेला निगेटिव्ह एनर्जी म्हणतात. तर ही ऊर्जा एकच असते तीच चांगल्या गोष्टीसाठी कार्य करते आणि वाईट गोष्टीसाठीही कार्य करत असते.

फक्त त्यामागची कारणे काय असतात की त्यामागची कर्मे, आपल्या कर्माच्या कार्यामुळे अशा प्रकारची ऊर्जा आपल्या जीवनास प्रभावित करत असते. तसेच दुसरी गोष्ट ही की आपल्यास कोणाची हाय लागणे तसेच कोणी तुमच्यावर तंत्र मंत्र केले असेल, किंवा जादूटोणा केला असेल.

काही वनस्पती असतात त्यात ही काही जडिबुटी असतात काही झाडांच्या फांद्या, मूळ असतात ज्यांना मंत्रांच्या माध्यमातून अभिमंत्रित करून घराच्या परिसरात किंवा अंगणात गाडले जाते तर हे पूर्ण घर बरबाद होऊन जाते आणि ते ही काही दिवसांच्या आत.

अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचा बऱ्याच प्रमाणात प्रभाव होऊन परिणाम होत असतो ज्याने आपली जीवनशैली हळूहळू बरबाद होण्यास सुरुवात होते. काही अशा गोष्टी असतात ज्या घरातील पोजिटिव्ह एनर्जीला वाढवण्यास मदत करतात. तसेच काही वस्तू अशा असतात ज्या या निगेटिव्ह एनर्जी ला संपवून टाकून त्यांना पळवून लावतात आणि पोजिटिव्ह एनर्जीला वाढवतात.

यासाठीच मी तुम्हाला एक धुरी सांगत आहे, ही धुरी करायची आहे आणि नंतर घरात फिरवायची आहे. यामुळे तुमच्या घरातील जेवढी नकारात्मक शक्ती आहे, भूत, प्रेत आदी, निगेटिव्ह एनर्जी या हळू हळू तुमच्या घरातून नष्ट होऊन जातील आणि तुमचे जीवन सुधारून जाईल.

यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायचा आहे? पहिली गोष्ट म्हणजे गुग्गुळ – याचा उपयोग सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी करतात आणि याचा सर्वात जास्त उपयोग आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो.

कारण गुग्गुळ हा पोजिटिव्ह एनर्जी चा स्तोत्र आहे. आणि जेव्हा याची धुरी घरी किंवा कोणत्याही स्थानी करता तर तिथे याचा सुगंध पसरतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. देविदेवतांच्या पोजिटिव्ह शक्ती आकर्षित होतात. आपल्या आसपासचे वातावरण शुद्ध होऊन जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे लोहबाणचा धूप , भीमसेन कापूर, पिवळी मोहरी, देशी गाईचे शुद्ध तूप, देशी काळा गुळ आणि देशी कडीलिंबाची सुकलेली पाने. वरील सर्व सामान एकत्र करून आपण धुरी देतो त्याप्रमाणे आठवड्यातून दोन वेळा मंगळवारी आणि शनिवारी घराच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक खोलीत त्या धुरीचा धूर पसरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here