नमस्कार मित्रांनो
मित्रानो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनि साडेसातीला सामोरे जावेच लागते. नवीन वर्ष 2023 धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, 17 जानेवारी 2023 रोजी जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा धनु राशीच्या लोकांची साडेसाती दूर होईल.
शनीची साडेसाती संपल्याने धनु राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळेल. सध्या शनिदेव मकर राशीत भ्रमण करत आहेत. नवीन वर्षात काही राशींवर शनीची साडेसाती संपेल, तर काही राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल.
धनु राशीसाठी नवीन वर्ष खास
17 जानेवारी 2023 रोजी धनु राशीच्या लोकांना शनि साडेसाती पासून पूर्ण मुक्ती मिळेल. त्यानंतर या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभाची जोरदार संधी मिळेल. जीवनात आनंद येईल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.
मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होईल
शनीच्या संक्रमणाने मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल. मीन राशीवर शनी साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल. शनीच्या महादशेमध्ये जातकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
हे उपाय केल्यास होतो फायदा
शनि चालिसाचे पठण केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते. शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे की तेल, काळे उडीद, काळे कापड, लोखंड, काळी घोंगडी दान करणे लाभदायक असते.
भगवान शंकर आणि हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून शनिदेवाची पूजा करावी.
एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहून ती वाटी तेलासह शनि मंदिरात दान केल्यास लाभ होतो. शनी मंत्र ओम शं शनैश्चराय नमः. ओम नीलांजन समभसं रविपुत्रम् यमग्रजनम्। छायामार्तंड सम्भूतं तमह नमामि शनेश्चरम् । जप करणे देखील फायदेशीर असल्याचे मानले जाते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.