धनु रास : जून महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
734

नमस्कार मित्रानो

मित्रानो धनु हि राशिचक्रातली नववी राशी आहे. या राशीच बोधचिन्ह आणि पुरुष ज्याचं अर्ध शरीर पुढच्या भागाचं पुरुषाचं आणि मागचं शरीर घोड्याचं आहे. पुरुष हातामध्ये धनुष्य बाण घेऊन आपल्या लक्षावर तो बाण रोखलेला आहे. परंतु तो बाण सोडलेला नाहीये.

याचा अर्थ असा कि मानवी बुद्धी अचाट असून घोडा म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची अमर्याद ताकद या राशीमध्ये आढळते. बुद्धी आणि ताकद यांचा अनोखा संगम याच राशीमध्ये झालेला आढळतो.

धनुष्य बाण ताणलेला आहे परंतु सोडलेला नाहीये म्हणजेच सर्व प्रकारची बुद्धी , कार्य करण्याची ताकद असून सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेताना मात्र थोडीशी मानसिक चलबिचल होण्याची सवय.

मित्रानो हि राशी अग्नितत्वाची राशी आहे. क्षत्रिय वर्णाची राशी असल्यामुळे कडक शिस्त आणि उच्च शिक्षणाची आवड असलेली हि राशी आहे. या राशीचे लोक शिक्षणाला अधिक जास्त प्राधान्य देतात. राशीचा स्वामी ग्रह सुद्धा गुरु म्हणजे संस्कार आणि सुबत्तेचा कारक ग्रह. अनेक गोष्टींची आवड असलेला ग्रह.

समाजकारण , राजकारण यात सक्रिय राहायला याना मनापासून आवडत असत. समाजातील अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत करायला त्यांचा नेहमीच खारीचा वाटा नाही तर शेर का वाटा असतो असे म्हणायला हरकत नाही. शिक्षण आणि शासकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करायला यांची नेहमीच पसंती राहते.

या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही नवीन आनंददायक गोष्टी घडतील, ज्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावरील विश्वास आणखी वाढेल आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने सर्वजण प्रभावित होतील. आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या कारण दोघांपैकी कोणाचेही आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

तुम्हाला भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळेल. जर तुम्ही त्यांच्याशी एखाद्या गोष्टीबद्दल रागावले असाल तर या महिन्यात ती नाराजी संपेल आणि दोघांमधील परस्पर प्रेम आणखी वाढेल.

व्यवसायाच्या दृष्टीकोनातून या महिन्यात तुम्हाला फायदा होईल, परंतु त्यासोबत नवीन शत्रू देखील तयार होऊ शकतात जे व्यवसायात तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा वेळी अधिक सावधगिरी बाळगा आणि कोणताही व्यावसायिक निर्णय जाहीरपणे बोलणे टाळा.

सरकारी अधिकाऱ्यांना या महिन्यात जास्त काळजी करण्याची गरज नाही. खाजगी नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. यावेळी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल.

उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, परंतु अशा वेळी त्यांचे लक्षपूर्वक ऐका कारण ते भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात कमी कष्टातही चांगले परिणाम मिळतील.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात अनेक क्षेत्रांतून संधी मिळतील, पण दुर्लक्षामुळे तेही तुमच्या हातून निसटू शकतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला विशेष लक्ष द्या.

जर तुम्ही एखाद्यासोबत प्रेमसंबंधात असाल तर या महिन्यात कोणीतरी तुमच्या नात्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत, पटकन कोणाच्याही बोलण्यात फासणे टाळा. अविवाहित व्यक्तींचे कोणाशी तरी जमण्याची दाट शक्यता असते.

जर तुमचे लग्न होऊन काही काळ झाला असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून शुभ संकेत मिळतील. तुमच्या दोघांमध्येही भविष्यातील रणनीतीबद्दल सखोल चर्चा होईल आणि दोघांमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांनाही चांगली बातमी मिळेल.

या महिन्यात तुमच्यासोबत काही अप्रिय घडू शकते. शनि तुमच्या आरोग्यावर भारी आहे. जिने चढताना , जड वस्तू उचलताना काळजी घ्या. शनिदेवाचा प्रकोप कमी करण्यासाठी शनिवारी तिळाचे दान करा.

या महिन्यात मानसिक त्रास होणार नाही. तथापि, महिन्याच्या मध्यात झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे काही काळ तणाव असेल. यापासून सुटका मिळवण्यासाठी झोपताना ध्यान करण्याची सवय लावल्यास बरे होईल.

जून महिन्यासाठी धनु राशीचा भाग्यशाली अंक 3 असेल. त्यामुळे या महिन्यात ३ अंकाला प्राधान्य द्या. जून महिन्यासाठी धनु राशीचा शुभ रंग मरून असेल. त्यामुळे या महिन्यात मरून रंगाला प्राधान्य द्या.

टीप : या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि मुख्यतः तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच काळजी घ्या आणि कोणतेही चुकीचे काम करणे टाळा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here