नमस्कार मित्रानो
मित्रानो विष्णु पुराणात माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. लक्ष्मीला हिंदु धर्मात संपत्तीची देवी मानली जाते. त्यामुळे ज्या घरात लक्ष्मी वास करते त्या घरात सुख ,समृद्धी , आनंद , पैसा यांची काहीच कमी राहत नाही. तुम्ही जर एखादे कुटूंब सुखी आणि समाधानी बघत असाल तर नक्कीच त्या घरात माता लक्ष्मीचा वास आहे असे समजावे.
देवी लक्ष्मीने इंद्रदेवला संपत्ती संदर्भात ज्या सूचना दिल्या होत्या, त्या सर्व गोष्टींचा विष्णू पुराणात उल्लेख आहे. त्यात स्पष्टपणे असा उल्लेख आहे कि ज्या लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते त्यांनी नंतर कितीही प्रयन्त केले तरी माता लक्ष्मी त्यांच्या घरी पाऊल ठेवत नाही.
मित्रानो अनेक लोक देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाने देवी लक्ष्मीची पूजा अर्चा करतात. तर काही लोक देवी लक्ष्मी घरात टिकून राहावी यासाठी चेटूक वापरतात. मित्रानो जादूटोणा करून आईला कधीच थांबवू शकत नाही उलटपक्षी असे केल्याने माता आपल्यावर क्रोधीत होते , आणि कायमचे घर सोडून निघून जाते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरांबद्दल , लोकांबद्दल सांगणार आहोत जिथे माता लक्ष्मीला कधीच जाणे आवडत नाही. ज्यामुळे दारिद्र्य आणि दुःख त्या घरात वाढत राहते आणि कुटुंबाला कधीही शांती मिळत नाही.
मित्रानो आपण समोरच्या व्यक्तीशी बोलताना कोणत्या भाषेत बोलतो , कोणत्या स्वरात बोलतो हे खूप महत्वाचं असत. जर आपण कोणाशी कटू शब्दात बोललो तर आपली प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात कमी होते आणि त्यांच्यावर आपला चांगला प्रभाव पडत नाही.
आपल्या वाईट शब्दामुळे समोरचा व्यक्ती अपमानित होतो. मित्रानो अशा वेळी आपल्याला समोरून चांगली वागणूक भेटेल याची अपेक्षा ठेवू नये. कारण जसे आपलं कर्म असेल तसेच आपल्याला फळ मिळणार. जर तुम्ही वाईट शब्दांचा वापर कराल तर समोरून देखील वाईट शब्दांचा वापर होईल.
याउलट जर आपण आपल्या भाषेत गोडवा ठेवला तर त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर खूप चांगला होईल आणि समोरील व्यक्ती मनापासून आपला आदर करेल. विष्णु पुराणात स्पष्ट लिहिले आहे की जे लोक कडू बोलतात आणि अपमानास्पद शब्द वापरतात, त्यांच्यावर आई लक्ष्मी नाराज होते आणि परत कधीही त्यांच्या घरी येत नाही.
यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही लाख मेहनत करा पण तुमचे अपमानित केलेले शब्द तुम्हाला कधीही श्रीमंत होऊ देणार नाहीत.
मित्रानो ज्या घरातील स्त्री वारंवार राग राग करते किंवा घरातील अन्य व्यक्ती नेहमीच भांडत असतात , आणि प्रियजनांना शिवीगाळ करून अपमानित करतात अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.मित्रानो मनुष्याचा राग त्याला नकारात्मक गोष्टी करायला भाग पाडतो.
अनेक घरांमध्ये पती -पत्नीमधील संबंध तुटण्यामागे त्यांचा राग आणि अहंकार असतो. याउलट, जर आपण घरात रागाऐवजी प्रेमाने बोललो तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यांना प्रामाणिक अंतःकरणाने प्रेम करणे आणि त्यांच्या प्रियजनांचा आदर करणे माहित असते अशांवर माता लक्ष्मी कायम प्रसन्न असतात.
ज्या घरात पंडित किंवा धार्मिक ग्रंथांचा अपमान होतो, त्या घरातून देवी लक्ष्मी कायमची निघून जाते आणि पुन्हा परत येत नाही. विष्णु पुराणात धार्मिक ग्रंथांना खूप उच्च आणि विशेष स्थान देण्यात आले आहे. याशिवाय ज्या घरांमध्ये दिवा पेटत नाही, त्या घरात पैशाची आवक कधीच होत नाही. आई लक्ष्मी कधीही मागे वळून त्या घराकडे पाहत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.