घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यामागे ही आहेत मुख्य कारणे.

0
271

नमस्कार मित्रानो

मित्रानो गरिबी ही अशी समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा जसे कि अन्न , वस्त्र , निवारा आणि शिक्षण यासारख्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते.

मित्रानो प्रत्येक व्यक्ती जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो, यासाठी तो पूर्ण समर्पण आणि जिज्ञासेने आपल्या कामाला गती देतो आणि त्यानंतरही आयुष्यभर गरिबीचा बळी राहतो.

व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप कष्ट करतो, कष्ट करूनही तो श्रीमंत होऊ शकत नाही. यामागे अनेक कारणे आहेत, शास्त्रानुसार अशी अनेक कामे आहेत, ज्यामुळे मला घरातील गरीबी कायम टिकून राहते. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती कारणे.

सूर्योदय झाल्यावर सुद्धा झोपून राहणे : मित्रानो प्रत्येक व्यक्तीने रात्री जेवून खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान आदी करून सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची पूजा जरूर करावी.

तुळशीचे रोप : घराच्या अंगणात मध्यभागी तुळस असणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. परंतु तुळशीचे रोप अचानक पूर्णपणे सुकते, जे घरातील संकट आणि गरिबी येण्याचे पूर्व संकेत देत असते.

काळ्या मुंग्या : जर काळ्या मुंग्या घरातील खारट पदार्थांमध्ये दिसू लागल्या आणि त्या जास्त दिसू लागल्या तर समजून घ्या कि तुमचा येणारा काळ हा वाईट असू शकतो.

घरात लावलेली झाडे : जर तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागली तर लगेचच सुकलेली पाने काढून टाका. घरातील झाडे नेहमी हिरवीगार असावीत. शक्य झालंच तर घरातील झाडे सुकू देऊ नका नाहीतर बुध ग्रह अशुभ फळ देतो आणि व्यक्तीवर कर्जाचा डोंगर होतो.

घरातील झाडू : घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक आहे , कारण यामुळे घरातून दारिद्र्य दूर होते, घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते. झाडू कधीच लटकून ठेवू नये. जमिनीवर सपाट ठेवावा. लटकवून ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. घरातील लहान मुले अचानक घर झाडू लागल्यास ते पाहुणे येण्याचे लक्षण मानले जाते.

संध्याकाळी अंधार पडल्यावर घर झाडून घेऊ नये. घरातील कोणीही सदस्य घरा बाहेर गेला तर लगेच झाडू नये. बाहेरील व्यक्तीने घरात प्रवेश केल्यावर त्या व्यक्तीला झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here