नमस्कार मित्रानो
मित्रानो धन, बुद्धिमत्ता, व्यापार, तर्क यांचा दाता बुध ग्रह एकाच राशीत फार कमी काळ राहतो. पण त्यांच्या राशी बदलाचा जीवनावर मोठा प्रभाव पडतो. बुध जुलैमध्ये 3 वेळा गोचर करत आहे, त्यामुळे या 4 राशीच्या लोकांवर या गोचरचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडण्याचे संकेत आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. प्रत्येक ग्रहाचा संक्रमण काळ वेगवेगळा असतो. बुद्धिमत्ता, तर्क, पैसा, व्यवसाय यांचा कारक बुध ग्रह 27 दिवसांत राशी बदलतो, परंतु विशेष परिस्थितीत हा काळ वाढतच जातो.
जुलै 2022 मध्ये बुध ग्रह 3 वेळा राशी बदलणार आहे. बुधाचे एका महिन्यात तीनदा गोचर सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव टाकेल. पण या 4 राशीच्या लोकांवर याचा खूप शुभ प्रभाव पडणार आहे.
बुधाने 2 जुलै रोजी राशी बदलली असून तो सध्या मिथुन राशीत आहे. येत्या १७ जुलैला बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि ३१ जुलैला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
वृषभ रास
जुलैमध्ये बुधाचे तीनदा होणारे गोचर वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. त्यांना नवीन नोकरी मिळेल आणि उत्पन्न वाढेल. या राशीचे लोक आता आपल्या हुशारीने प्रत्येक परिस्थिती चांगल्या प्रकारे मात करणार आहेत. आता यांची आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे.
सिंह रास
बुधाच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होईल. उत्पन्न वाढेल. नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. नाते संबंध सुधारतील. जीवनसाथीची चांगली साथ लाभेल. व्यावसायात चांगली प्रगती होईल.
कन्या रास
बुधाचे होणारे गोचर कन्या राशीच्या लोकांना खूप आनंद देईल. आतापर्यंत रखडलेल प्रमोशन आता मिळणार आहे. पगारवाढ होईल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते.
मकर रास
मकर राशीच्या लोकांना जुलैमध्ये बुधाच्या गोचरचा फायदा होईल. त्यांना करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. धनलाभ होईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.