नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो शनिवार हा शनी देवांना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय शनी देवांना प्रसन्न करतात. शनी देवांची अनेक वाहने आहेत त्यापकी काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन समजले जाते.
मित्रांनो प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्याला घरातील एक वस्तू खायला घालायची आहे त्यामुळे शनिदेव तुम्हाला नक्की प्रसन्न होतील. आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ स्थानी असतात हे अशुभ स्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात.
विशेष करून जर तुमच्या कुंडली मध्ये शनी अशुभ स्थानी असेल तर मात्र घरामध्ये आजारपण निर्माण होत. घरातील लोक वारंवार आजारी पडतात. नोकरी धंद्यामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये हळू हळू गरिबी येते.अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.
शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घातलेल्या या छोट्याश्या वस्तू मुळे आपल्या आयुष्यातून आपण बऱ्याच अडचणी दूर करू शकतो. हा उपाय आपण केल्यास आपल्या कुंडलीमधील शनीची गती वाढते व शनीच्या साडेसातीपासून आपली मुक्ती होते.
घरातील आजारपण दूर होत. घरामध्ये सुख शांती प्रस्थापित होते. मित्रांनो हा उपाय अत्यंत श्रद्धेने करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊ शनिवारी काळ्या कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे.
हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. शनिवारच्या दिवशी पहिली भाकरी किंवा चपाती तयार करून झाल्यावर ती गोमातेसाठी काढून ठेवायची आहे. आणि शेवटची चपाती किंवा भाकरी असेल ती आपण काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे.
हि चपाती करताना थोडस मोहरीचं तेल चपातीला लावायचं आहे. लक्षात घ्या अगदी थोडस तेल लावायचं आहे, जास्त लावल्यास तो कुत्रा ती चपाती खाणार नाही. तर अशी हि मोहरीचं तेल लावलेली चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे.
ती खाऊ घालत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र अतिशय साधा आणि सोप्पा आहे. तो मंत्र म्हणजे ओम भ्रम कालभैरवाय नमः. हा मंत्र आपल्याला जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा म्हणायचा आहे.
नंतर त्या कुत्र्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्या नंतर थेट घरी परतायचं आहे. हा उपाय आपण दर शनिवारी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी मनामध्ये भाव, मनामध्ये श्रद्धा असायला हवी.
हा उपाय केल्याने आपल्या अनेक समस्यांचे निराकारण होते. घरामधील लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहत, घरामध्ये पैशाचे मार्ग मोकळे होतात. आणि लवकरच आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरवात होते.
जर तुम्हाला देखील अडचणी असतील, घरी सारखेच आजारपण असेल, आर्थिक चणचण असेल तर हा सोप्पा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.