नमस्कार मित्रानो
मित्रानो साधारणपणे मुली पायावर काळा धागा बांधतात आणि असे केल्याने वाईट नजर आणि शनिदोषाचा प्रभाव बर्याच प्रमाणात कमी होतो. याशिवाय काळा धागा हा देखील आजकाल फॅशन ट्रेंड बनला आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की काही राशीच्या मुलींनी पायात काळा धागा बांधणे अशुभ असते. आपण जाणून घेऊया की काळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ आहे.
मेष रास
मंगळ देखील मेष राशीचा स्वामी आहे त्यामुळे या राशीच्या मुलींनी काळा धागा घालू नये. हे अशुभ मानले जाते आणि यामुळे त्यांना जीवनात दुःख आणि अपयशांना सामोरे जावे लागू शकते.
तूळ रास
तूळ राशीच्या मुलींसाठी काळा धागा घालणे खूप फायदेशीर आहे. तूळ राशीवर शनीचा प्रभाव आहे आणि शनीला काळा रंग प्रिय आहे. त्यामुळे या राशीच्या मुलींनी काळा धागा घातला तर ते त्यांच्यासाठी खूप शुभ असते.
वृश्चिक रास
ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ काळ्या रंगाचा तिरस्कार करतात. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या मुलींनी हातात किंवा पायात काळा धागा घातला तर त्यांना मंगळाच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. यामुळे जीवनात अनेक समस्या डोके वर काढू शकतात.
कुंभ रास
जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर काळा धागा घालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. या राशीच्या मुलींना काळा धागा धारण केल्याने नोकरीत यश आणि जीवनात यश मिळते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.