नमस्कार मित्रानो
मित्रानो दिवाळी तर सुरु आहेच पण आज सण आला आहे तो भाऊबीजेचा. मित्रानो भाऊ बीज हा बहीण व भावाच्या अतूट नात्यातील सर्वात मोठा समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी , त्याची प्रगती होण्यासाठी , त्याच्या संरक्षणासाठी भगवंताकडे प्रार्थना करत असते.
यामागील गोष्ट अशी आहे कि यम आणि यमी हे दोघे भाऊबहीण बऱ्याच दिवसानंतर एकमेकांना भेटले. बऱ्याच दिवसाने आपल्या बहिणीकडे यमदेव गेले. त्यामुळे बहीण देखील प्रसन्न झाली आणि तिने यमाला गोडधोड खाऊ घातले.
यमीने केलेले भोजन आणि गोडधोड खाऊन यमराज तृत्प आणि संतुष्ट झाले. यमीला काहीतरी वर मागण्यासाठी सांगितले. यमीने काही मागण्यास नकार दिला. पण यमदेवाने आग्रह केला आणि तिला एक वर मागण्यास सांगितला.
यमीने वर मागितला कि या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवळेल आणि त्याची यमकाशातुन मुक्ती व्हावी असा वर यमीने यमदेवाला मागितला. यमदेवाने सुद्धा तथास्तु म्हणून तिला वर देऊ केला.
म्हणूनच मित्रानो प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण अवश्य कराव. यामुळे त्याची यम काशातुन सुटका होते. मित्रानो याच दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. त्याला सर्व सुख मिळावी म्हणून औक्षण करत असते.
मित्रानो या दिवशी भाऊ देखील आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही भेटू वस्तू देत असतो . तीच काही दुःख असेल , तिला काही समस्या असतील त्यातून तिला सोडवण्यासाठी मदत करत असतो.
मित्रानो रक्षाबंधनासारखाच भाऊबीजेचा सण साजरी केला जातो. मित्रानो या वर्षी आपल्या भावाला ओवळण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंतचा आहे. मित्रानो तसे कर दिवसात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही भावाला ओवाळू शकता.
पण शक्य असल्यास या वेळेत ओवाळायला जमले तर अतिउत्तम. तुम्ही या मुहूर्तावर जर भावाला ओवाळले तर त्याचा शुभ लाभ नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळेल. शक्य असेल तर याच वेळेत तुम्ही आपल्या भावाला ओवाळा.
मित्रानो भावाला जेवायला वाढताना तांदळाचा एखादा पदार्थ जेवणात नक्की वाढा. काही खास पदार्थ करायची गरज नाही. तांदळाची खीर किंवा भात जरी खाऊ घातला तरी चालेल. भाऊबीजेचा हा सण तुम्ही अशा प्रकारे नक्की साजरा करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.