नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी प्रौष्ठपदी पोर्णिमा हि विशेष फलदायी मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे.
पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी मानला जातो. या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा मोठ्या भक्ती भावाने केली जाते. सत्य नारायणाची कथा ऐकून या काळात प्रसाद ग्रहण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. घरामध्ये सुख सौभाग्य , शांती नांदावी म्हणून या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेतला जातो.
मान्यता आहे कि या दिवशी लक्ष्मी नारायणाची उपासना केल्याने मनोवांछित फल प्राप्त होते. मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात आणि सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होते. भाद्रपद पौर्णिमेची रात्र असून आजपासून या पाच राशींच्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरवात होण्याचे संकेत आहेत.
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. आता जीवनातील पैशांची तंगी दूर होणार आहे.
मेष रास
मेष राशीसाठी येणारा काळ सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी , पैशाची चणचण आता मिटणार आहे. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनात अतिशय सुंदर परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरू शकतो.
कर्क रास
भाद्रपद पौर्णिमेपासून कर्क राशीच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासुन आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात सुख सौभाग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. या काळात लक्ष्मी नारायणाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
कन्या रास
कन्या राशीवर भाद्रपद पौर्णिमेचा शुभ प्रभाव पडणार असून भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. या काळात सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील जीवनात वाढ दिसून येईल. व्यवसायातील कमाईत वाढ होण्याचे संकेत आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून करियर मध्ये प्रगती आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. या काळात नातेसंबंध आणि सामाजिक संबंध सुधारतील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे भाद्रपद पौर्णिमा. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकते. हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे.
या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. नवीन कामाची सुरवात लाभकारी ठरणार आहे. नव्या योजना सफल बनतील. या काळात आपल्या महत्वकांक्षेत वाढ होणार असून ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीवर भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यवसायात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात अडलेले एखादे काम या काळ पूर्ण होईल. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस राहतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.